Join us

वेसावे कोळीवाड्यात वरळी पॅटर्न हवा- भारती लव्हेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 1:40 AM

आजही सलग तिसऱ्या दिवशी वेसावकरांनी येथे कडकडीत जनता कर्फ्यू पाळला असल्याची माहिती वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय व सरचिटणीस राजहंस लाकडे यांनी ‘लोकमत’ला दिली.

मनोहर कुंभेजकर मुंबई : एकीकडे के पश्चिम वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांनी २५०चा आकडा पार केला असून आता येथील वेसावे कोळीवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या आजमितीस ३४ वर गेली आहे. आज येथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली नाही. या आशादायक वातावरणाने येथील कोळी बांधवांना दिलासा मिळाला आहे़ आजही सलग तिसऱ्या दिवशी वेसावकरांनी येथे कडकडीत जनता कर्फ्यू पाळला असल्याची माहिती वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय व सरचिटणीस राजहंस लाकडे यांनी ‘लोकमत’ला दिली.वेसावे कोळीवाड्यात कोरोना रुग्णांची रोज वाढती संख्या लक्षात घेता येथे वरळी पॅटर्न अमलात आणा, अशी आग्रही मागणी वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे. गेले तीन दिवस येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून हा भाग कम्युनिटी स्प्रेड व्हायरसकडे जात असून, वेसावे कोळीवाडा हा तिसºया स्टेजमध्ये पोहोचण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. वेसावे कोळीवाड्याच्या हॉटस्पॉटच्या ठिकाणी मास स्क्रीनिंग व फिव्हर स्क्रीनिंगची व्यवस्था तातडीने उपलब्ध करून दिल्यास संशयित कोरोना रुग्णाला शोधून त्यांचे अन्य ठिकाणी क्वारंटाइन करता येईल. त्यामुळे कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कडक पावले उचलण्याची भूमिका त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून व्यक्त केलीे आहे.महापालिका प्रशासनाकडून तातडीने पावले उचलून क्वारंटाइन सुविधा, जलद कोरोना टेस्टिंंग प्रणाली, अ‍ॅम्ब्युलन्सची उपलब्धता याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी व्यक्त केले़>‘लोकमत’चे आभार‘लोकमत’ वेसावे कोळीवाड्यातील कोरोनाच्या सद्य:स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.१८ एप्रिल रोजी सर्वप्रथम ‘वेसाव्यात कोरोनाचे झाले १० रुग्ण’ अशी बातमी ‘लोकमत आॅनलाइन’ व ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्याने येथील सद्य:स्थिती महापालिका प्रशासन व राज्य शासनाच्या नजरेत आणून दिल्याबद्दल येथील कोळी बांधवांनी ‘लोकमत’ला खास धन्यवाद दिले होते.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस