मुंबई : मुंबईला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर, सखल भागासह ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा बुधवारी दुपारपर्यंत झाला. दरम्यान, बुधवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने, रेल्वे वगळता रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली आणि पाण्याचा निचरा पूर्णत: झाल्याने काही अंशी का होईना, मुंबईकरांना दिलासा मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता, बहुतांश कार्यालयांना सुटी असल्याने, मुंबईकर अत्यंत कमी संख्येने घराबाहेर पडले. त्यामुळे लोकल सेवा कोलमडलेली असली, तरी लोकांचे हाल मात्र झाले नाहीत.मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले असतानाच, बुधवारीही मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. प्रत्यक्षात तुरळक ठिकाणी पडलेल्या सरी वगळता, बुधवार कोरडा गेला. परिणामी, मंगळवार वगळता नेहमीप्रमाणेच हवामान खात्याचा पावसाचा अंदाज चुकला. याच काळात शहरासह उपनगरातील रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली होती.पालिकेमुळेच मुंबई पूर्वपदावर...मंगळवारी मुंबईवर तब्बल ९ किलोमीटर उंचीचा ढग होता. एका मर्यादेपर्यंत आपण निसर्गाशी मुकाबला करू शकतो. मुंबई महापालिकेने केलेल्या कामांमुळेच मंगळवारच्या मुसळधार पावसानंतर शहर दुसºया दिवशी पूर्वपदावर आले, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.‘कोसळधारे’त २१ जणांचे बळी तर ४० हून जास्त जखमीअभूतपूर्व ‘कोसळधारे’मुळे झालेले दुष्परिणाम आता समोर येत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत दोन बालकांसह १२ जणांच्या अंगावर भिंत कोसळून अथवा पाण्यात वाहून मृत्यू झाले आहेत, तर ४०हून अधिक जण जखमी आहेत.ठाणे जिल्ह्यात ४ जण बुडाले तर चौघे बेपत्ता आहेत. पालघर जिल्ह्यात पाच जण बुडून मृत झाल्याने पावसाच्या बळींची संख्या २१ वर पोहोचली आहे.या दुर्घटनेत मृत्यू व जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून, अनेक जण बेपत्ता असून, त्यांची शोध मोहीम सुरू आहे.डॉक्टर ड्रेनेजमध्ये वाहून गेलेबॉम्बे रुग्णालयाचे प्रख्यात पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर परळ येथील उघड्या ड्रेनेजमध्ये पडल्याची नोंद पोलिसांनी केली असून, त्यांच्या तपासासाठी गेल्या १८ तासांपासून अग्निशमन दलाची शोधमोहीम सुरू आहे. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविण्यात आली आहे.वकिलाचा कारमध्ये मृत्यू : अतिवृष्टीमुळे सायन येथील गांधी मार्केटमध्ये स्वत:च्या कारमध्ये अडकून प्रियेन मजिठीया या ३० वर्षीय वकिलाचा गुदमरून मृत्यू झाला. बुुधवारी पोलिसांनी बेशुद्धावस्थेत बाहेर काढून रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
चिंता ओसरली! पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा, जनजीवन पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 6:42 AM