चिंतेत भर! मुंबईत १,५३९ नवीन कोरोना रुग्णवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 05:58 AM2021-03-11T05:58:11+5:302021-03-11T05:58:32+5:30
राज्यात बुधवारी आणखी १३,६६९ रुग्ण वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे संकट पुन्हा अधिक गडद होऊ लागले असून, एका दिवसात राज्यात कोरोनाचे १३ हजार ६५९ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढ ही दीड हजारांच्या पुढे गेली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण सतत वाढत असून एका दिवसात एवढे रुग्ण वाढण्याचा गेल्या काही दिवसांतील हा उच्चांक आहे. दिवसभरात मुंबईत १५३९, नागपूरमध्ये १५१३, पुण्यात १३८४, नाशिकमध्ये ७५० एवढे रुग्ण नोंदले गेले आहेत. राज्यात सध्या ॲक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण ९९ हजार एवढे आहे. दिवसभरात ९,९१३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर एकूण ५४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
५ दिवसांतील नोंद
१० मार्च : १३,६५९
९ मार्च : ९,९२७
८ मार्च : ८,७४४
७ मार्च : ११,१४१
६ मार्च : १०,१८७
मुंबईत शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ३७ हजार १२३ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ५११ झाला आहे.