लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचे संकट पुन्हा अधिक गडद होऊ लागले असून, एका दिवसात राज्यात कोरोनाचे १३ हजार ६५९ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढ ही दीड हजारांच्या पुढे गेली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण सतत वाढत असून एका दिवसात एवढे रुग्ण वाढण्याचा गेल्या काही दिवसांतील हा उच्चांक आहे. दिवसभरात मुंबईत १५३९, नागपूरमध्ये १५१३, पुण्यात १३८४, नाशिकमध्ये ७५० एवढे रुग्ण नोंदले गेले आहेत. राज्यात सध्या ॲक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण ९९ हजार एवढे आहे. दिवसभरात ९,९१३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर एकूण ५४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
५ दिवसांतील नोंद१० मार्च : १३,६५९९ मार्च : ९,९२७८ मार्च : ८,७४४७ मार्च : ११,१४१६ मार्च : १०,१८७
मुंबईत शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ३७ हजार १२३ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ५११ झाला आहे.