आघाडीची नव्हे, शिवसेनेची चिंता करा; नवाब मलिक यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 01:29 AM2019-01-03T01:29:35+5:302019-01-03T01:30:14+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी देशात व महाराष्ट्रामध्ये ठरलेली आहे आणि आम्ही एकत्रितच निवडणुका लढविणार आहोत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि समविचारी पक्षांच्या आघाडीची चिंता तुम्ही करु नका, आधी तुमचा सहकारी पक्ष शिवसेना तुमच्या सोबत रहाते की नाही ते बघा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.
मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला वेगवेगळे लढण्याचे आव्हान दिले आहे. त्या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील आम्हाला आव्हान देत आहेत की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये हिम्मत असेल तर वेगवेगळी निवडणूक लढवून दाखवा. परंतु आमची आघाडी निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी देशात व महाराष्ट्रामध्ये ठरलेली आहे आणि आम्ही एकत्रितच निवडणुका लढविणार आहोत. तुमचे सहकारी पक्ष तुमच्यासोबत निवडणूका लढवू इच्छित नाहीत किंवा यायला तयार नाही त्या भीतीपोटी तुम्ही दुसऱ्या पक्षांना आव्हान देण्याची वेळ तुमच्यावर आल्याचे मलिक म्हणाले.