चिंताजनक ! राज्यात १० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 07:46 PM2020-07-18T19:46:03+5:302020-07-18T19:46:21+5:30

मागील काही दिवसांत संसर्गाचा आलेख चढता

Worrying! Corona infection in more than 10,000 children in the state | चिंताजनक ! राज्यात १० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग

चिंताजनक ! राज्यात १० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग

Next
ठळक मुद्दे राज्यात एक महिन्यांपूर्वी १८ जून रोजी नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या ३ हजार ८६६ बालकांना कोरोना झाला आहे

स्नेहा मोरे

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या टप्प्यावर आहे. यात आता चिंतेची बाब म्हणजे राज्यात बालकांना होणाऱ्या कोरोनाच्या संसर्गात वाढ झाली आहे. राज्यात १० हजार ६३९ बालकांना कोरोना झाला आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ३.७६ टक्के आहे. त्यामुळे आता चार महिन्यांनंतर ही संख्या वाढत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात एक महिन्यांपूर्वी १८ जून रोजी नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या ३ हजार ८६६ बालकांना कोरोना झाला आहे. तर १८ मे रोजी हे प्रमाण १ हजार ५९ इतके होते. त्यामुळे दिवसागणिक बालकांच्या आऱोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, एकूण कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी अभ्यासली असता, ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये जास्त आरोग्याच्या समस्या नसतात. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. त्यांच्यामध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, अस्थमा आणि अन्य काही आजार नसतात. त्यांची फुप्फुसेही चांगल्या परिस्थितीत असतात. राज्यात १० हजारांहून अधिक लहान मुले कोरोनाने संक्रमित झाले आहेत. मात्र, त्यांचा बरे होण्याचे प्रमाण ही चांगले आहे.

पालिकेच्या कॉन्प्रिहेंशन थॅलेसेमिया केअर पीडियाट्रिक डर्मेटोलॉजी ऑंकोलॉजी अॅण्ड बीएमटी सेंटर'च्या संचालक डॉ. ममता मंगलानी यांनी सांगितले की, सर्वाधिक मुलं लक्षणरहित असतात. काही अभ्यासानुसार, लहानपणी दिली जाणारी बीसीजी, एमएमआर, पोलिओ लसीमुळे त्यांना दुप्पट रोगप्रतिकारक शक्ती मिळते. सर्वसामान्य मुलं तर या रोगापासून बरे होत आहेत. आतापर्यंत जी बालके कोरोना बाधित झाली त्यांच्यात लक्षणे तितकी गंभीर नव्हती. ती सौम्य असली तरी इतरांना त्यांच्यापासून संसर्ग होऊ शकतो, ही बाब दुर्लक्ष करून चालणार नाही. मोठ्यांच्या तुलनेत बालकांची अधिक कटाक्षाने काळजी घ्यायला हवी. स्वच्छता, भौतिक दूरता अत्यंत गरजेची आहे. घराबाहेर अनावश्यक पडू नका. गर्दी टाळा. मास्क वापरा. कुठल्याही आजाराचे मूळ रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव आहे. ती मजबुत ठेवण्यासाठी आहार, योग, प्राणायाम, हलका व्यायाम, पुरेशी झोप घ्यावी.

कालावधी     रुग्णसंख्या    टक्केवारी

१८ जुलै      १०,६३९       ३.७६

१८ जून      ३८६६        ३.४२

१८ मे        १०५९        ३.४६
 

Web Title: Worrying! Corona infection in more than 10,000 children in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.