चिंताजनक, राज्यातील उपचाराधीन रुग्ण चार हजारांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:08 AM2021-02-23T04:08:19+5:302021-02-23T04:08:19+5:30

दिवसभरात काेराेनाचे ६ हजार ९७१ रुग्ण, ३५ मृत्यू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णांमध्ये ...

Worryingly, the number of patients undergoing treatment in the state increased by four thousand | चिंताजनक, राज्यातील उपचाराधीन रुग्ण चार हजारांनी वाढले

चिंताजनक, राज्यातील उपचाराधीन रुग्ण चार हजारांनी वाढले

Next

दिवसभरात काेराेनाचे ६ हजार ९७१ रुग्ण, ३५ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णांमध्ये भर पडत आहे. त्यामुळे राज्य शासनासह स्थानिक प्रशासनही संसर्ग नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहेत. राज्यात रविवारी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. राज्यात शनिवारी ४८ हजार ४३९ रुग्ण उपचाराधीन असल्याची नोंद होती, यात चार हजार रुग्णांची वाढ होऊन रविवारी ५२ हजार ९५६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात रविवारी ६ हजार ९७१ रुग्ण आणि ३५ बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २१ लाख ८८४ पोहोचली असून बळींचा आकडा ५१ हजार ७८८ झाला आहे. दिवसभरात २ हजार ४१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत एकूण १९ लाख ९४ हजार ९४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्याचा मृत्युदर २.४७ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५७ लाख २० हजार २५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.३६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४२ हजार ५३६ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १ हजार ७३२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

* अशी झाली सक्रिय रुग्णांत वाढ

२१ फेब्रुवारी - ५२ हजार ९५६

२० फेब्रुवारी - ४८ हजार ४३९

१९ फेब्रुवारी - ४४ हजार ७६५

१८ फेब्रुवारी - ४० हजार ८५८

१७ फेब्रुवारी - ३८ हजार १३

----------------

Web Title: Worryingly, the number of patients undergoing treatment in the state increased by four thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.