Join us  

Devendra Fadanvis: उद्धव ठाकरेंसोबत एक कप चहा घेणार का? फडणवीसांनी हात उंचावून दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 4:48 PM

आम्ही बदला घेणार हे नक्की होतं, पण कसा आणि कधी हे निश्चित नव्हतं, असेही फडणवीस यांनी म्हटलं. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच राजकीय सामना सुरू झाला होता. त्यातून महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. शिवसेनेकडून झालेला हा वार भाजपला मोठी जखम देऊन गेला होता. त्यामुळेच, या जखमेचा बदला घेण्यासाठी पलटवार करण्याचंही भाजपने ठरलं होतं. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे मान्य केलं असून आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्याचा हा बदला असल्याचं त्यांनी म्हटलं. आम्ही बदला घेणार हे नक्की होतं, पण कसा आणि कधी हे निश्चित नव्हतं, असेही फडणवीस यांनी म्हटलं. 

देवेंद्र फडमवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन विविध प्रश्नांवर उत्तर दिली. मिशन गुवाहटी, शिवसेना-भाजप यांच्यातील वाद, राजकीय महत्त्वाकांक्षा यांसंदर्भातील प्रश्नांवर त्यांनी मनसोक्त उत्तरे दिली. तसेच, शिवसेनेनं आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता, त्याचा बदला आम्ही घेतला, राज्यात पुन्हा भाजप सत्तेत आलं, असेही त्यांनी सांगितलं. दरम्यान, याचवेळी उद्धव ठाकरेंसोबत एक कप चहा घेणार का, असा सवाल विचारला असता, त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. 

देवेंद्र फडणवीसांना एका न्यूज चॅनेलमध्ये रॅपिड फायर प्रश्न विचारण्यात आले होते. त्या प्रश्नाला केवळ Yes किंवा No या फलकाद्वारे उत्तर द्यायचं होतं. फडणवीसांनी बिनधास्तपणे या प्रश्नावर उत्तर दिलं. त्यामध्ये, त्यांना पत्नी अमृता फडणवीस, कोरोना काळातील घरकाम आणि राजकीय प्रश्नही विचारण्यात आली. उद्धव ठाकरेंसोबत वन टू वन एक कप चहा पिणार का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यावर, फडणवीसांनी आपल्या हातातील फलक Yes असा दर्शवला. फडणवीसांच्या या उत्तरावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. 

नरेंद्र मोदींनी कधी रागावलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधी तुम्हाला रागवलं आहे का? या प्रश्नावरही फडणवीसांनी येस असे उत्तर दिले. तर, राजकारण सोडून द्यावं असं कधी वाटलं होतं का? या प्रश्नावरही फडणवीसांनी Yes हेच उत्तर दिलं. त्यानंतर, प्रत्येकाला आपलं प्रोफेशन सोडून द्यावं वाटतं, पण दुसऱ्यादिवशी माणूस पुन्हा कामाला लागतो, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. तसेच, अजित पवारांसोबत एकत्र येणं ही तुमची राजकीय चूक होती का, या प्रश्नावरही त्यांनी हो असे उत्तर देत चूक असल्याचं मान्य केलं.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेशिवसेनाराजकारण