Join us

व्वा, एका भारतीय स्त्रीने मोडली पुरुषी मक्तेदारी, वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात 'ती' रेफरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 1:45 PM

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन भारतीय महिलेनं पुरुषी मक्तेदारी मोडल्याचं म्हटलंय.

मुंबई - महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना आज होत असून संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष सामन्याकडे लागले आहे. या स्पर्धेतून भारतीय महिला संघ बाहेर पडला आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळविला जात आहे. या सामन्यासाठी आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पंच पॅनेलमधील भारताची जी. एस. लक्ष्मी सामनाधिकारी, पंच म्हणून कार्यरत राहणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय महिलेला मिळालेल्या या सन्मानाचं गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कौतूक केलं आहे. 

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन भारतीय महिलेनं पुरुषी मक्तेदारी मोडल्याचं म्हटलंय. महिलांच्या क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार असला तरी त्याची रेफरी (मुख्य पंच) म्हणून भारताची जी.एस. लक्ष्मी काम पाहणार आहे. पुरुषी मक्तेदारी एका भारतीय स्त्रीने मोडली. वा!.. असे ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड हे नेहमीच आपल्या ट्विटरवरुन पुरोगामी विचारांना शेअर करत असतात. तसेच, आधुनिक विचार आणि महिला सक्षमीकरणावरही ते भाष्य करत असतात. त्यातच, आता त्यांनी ट्विटरवर मांडलेले विचार अनेकांना आवडले असून ते लाईक करत आहेत. 

दरम्यान, इंग्लड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक अंतिम सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेची लॉरेन ऍजेनबग आणि न्यूझीलंडची किम कॉटन या मैदानावरील पंच राहतील. विंडीजची जॅक्वेलिन विल्यम्स ही टीव्ही पंच म्हणून राहील.

कोण आहे लक्ष्मी

2020 च्या डिसेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या विश्वचषक लीग-2 पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताची महिला पंच जी. एस. लक्ष्मीने पंचगिरी केली होती. पुरुषांच्या वनडे क्रिकेट सामन्यात पंचगिरी करणारी जी. एस. लक्ष्मी ही भारताची पहिली महिला पंच ठरली. महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाला बाद फेरीत प्रवेश मिळविता आला नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाने विंडीजचा तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

टॅग्स :इंग्लंडभारतभारतीय महिला क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया