Join us

यंत्रमागधारकांच्या लेखी सूचनांचा धोरणात्मक बदलांमध्ये समावेश करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या सर्वप्रकारच्या उपाययोजना केल्या जातील. यंत्रमागधारकांनी आपल्या सूचना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या सर्वप्रकारच्या उपाययोजना केल्या जातील. यंत्रमागधारकांनी आपल्या सूचना लेखी स्वरुपात द्याव्यात, त्या अनुषंगाने धोरणात्मक बदल करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी यंत्रमागधारकांच्या शिष्टमंडळास दिली.

मंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय निवासस्थानी राज्यातील यंत्रमागधारकांच्या विविध समस्यांबाबत बैठक झाली. राज्यातील 27 下अश्वशक्तीवरील载 यंत्रमागधारकांना 下वीजदरात载 प्रतियुनिट 0.75 पैसे सवलत देणे, यंत्रमागधारकांना मल्टी पार्टी वीज जोडणी देणे, यंत्रमाग उद्योजकांनी घेतलेल्या कर्जावर व्याज दरात 5 टक्के सवलत योजनेतील त्रुटी दूर करणे अशा विविध विषयांच्या अनुषंगाने यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

अस्लम शेख म्हणाले की, अन्य 下उद्योगांप्रमाणेच载 वस्त्रोद्योग क्षेत्रालाही 下टाळेबंदीचा载 फार मोठा फटका बसलेला आहे. वस्त्रोद्योग 下हे载 देशातील दुसऱ्या 下क्रमांकाचं载 रोजगार देणारे क्षेत्र आहे. त्यामुळे 下या载 क्षेत्राला 下उर्जितावस्था载 आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

यावेळी वस्त्रोद्योग राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार मुफ्ती महंमद इस्माईल, राज्याचे वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, आयुक्त शीतल वागळे व वस्त्रोद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळात सतीश कोष्टी, सागर चाळके, मदन कारंडे, अमित गाताडे, राजाराम धारवट, राहुल खंजिरे, उदयसिंग पाटील आदी उपस्थित होते.

----- -***************-- --------