राजू काळे ल्ल भाईंदर
पालिकेत मंगळवारी पार पडलेल्या स्थायी सभापती निवडणूक नाटय़ामागे दोन्ही पक्षांच्या वरीष्ठांमध्ये लेखी समझोता झाल्याचे समोर आले असून त्यात भाजपाने शिवसेनेला पुढील दोन वर्षे स्थायी सभापतीपदासह आणखी काही पदे देण्याचे अमिष दाखवून प्रत्यक्षात केवळ दीड वर्षावरच त्यांची बोळवण केल्याचे उजेडात आले आहे.
यंदाच्या पालिकेतील सत्ता परिवर्तनात शिवसेनेने भाजपाला सहकार्य करण्याचे ठरविल्याने त्यांच्या कुरघोडींना जाणीवपूर्वक नजर अंदाज केले जात असल्याची चर्चा सेनेच्याच पदाधिकाय््रांत सुरु झाली आहे. 12 ऑगस्ट 2क्12 रोजी पार पडलेल्या पालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर संभाव्य सत्तेतील वाटपावर सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, आ. प्रताप सरनाईक व आ. नरेंद्र मेहता यांच्यात बैठक झाली होती. त्यावेळी युती सत्तेवर आल्यास प्रत्येक पदसिद्ध अधिकारी पदावर आळीपाळीने दोन्ही पक्षांना पदे देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यानुसार स्थायीच्या दुस:या वर्षी भाजपाने सभापतीपद हाती राखले. यंदाची तिसरी टर्म सेनेला देण्याचे निश्चित झाल्याने सेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, भाजपा आ. मेहता यांनी ऐन स्थायी सभापती निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या सदस्या वंदना पाटील यांना फोडण्यात यश मिळवून स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास भाग पाडले.
यामुळे स्थायीतील प्रत्येकी 8 सदस्यांऐवजी आघाडीकडे 7 तर युतीकडे 8 सदस्य अस्तित्वात राहिले. या नाटय़ामागे आ. मेहता यांना पुन्हा स्थायी सभापती पद हाती राखण्याची तीव्र इच्छा प्रकट झाल्याचे संकेत मिळत असतानाच त्यांनी त्यासाठी पक्षाच्या वरीष्ठांमार्फत मातोश्रीवर विनंत्या धाडण्याचे सत्र सुरु केले. त्यात त्यांना यश आल्याने सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी मंत्री शिंदे, आ. सरनाईक यांना भाजपासोबत बैठक घेण्याची सुचना केली. त्यानुसार सोमवारी रात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री तावडे, आ. मेहता यांच्यासोबत सेनेच्या शिष्टमंडळाने बैठक घेतली. त्यात आ. मेहता यांच्या आग्रहास्तव यंदाच्या स्थायीचे सभापतीपद सेने ऐवजी भाजपाकडे देण्याची गळ घालण्यात आली.
त्याला सेनेच्या शिष्टमंडळाने विरोध केल्यानंतर पुढील दोन वर्षे स्थायी सभापतीपदासह सत्ता परिवर्तनानंतर उपमहापौरपद, प्रभाग समिती क्र. 3 व 4 मधील सभापतीपद प्रत्येकी 2 व 1 वर्षासाठी निर्विवाद देण्याचे अमिष सेनेच्या शिष्टमंडळाला दाखविण्यात आले. त्यावर शिष्टमंडळाने आ. मेहता यांनी लेखी हमी देण्याची मागणी केली.
मंगळवारी स. 1क् वा.च्या
सुमारास आ. मेहता यांनी सेनेच्या शिष्टमंडळाला पद वाटपाची लेखी हमी दिल्यानंतर स. 1क्.15 ते 1क्.3क् वा. दरम्यान सेनेच्या स्थानिक गटनेत्या निलम ढवण यांना संपर्क
साधून सेनेचे उमेदवार हरिश्चंद्र आमगावकर यांना अर्ज मागे घेण्याची सुचना देण्यात आली.
यामुळे सभापतीपदी विराजमान होण्याची स्वपAे उराशी बाळगून असलेल्या आमगावकर यांनी
जड अंत:करणाने उमेदवारी मागे घेतली.
ऑगस्ट 2क्17 मध्ये होणाय््रा निवडणुकीनुसार स्थायीची मुदत अडिच वर्षार्पयत आहे. त्यात यंदाचे सभापती पद भाजपाकडे गेल्याने उर्वरीत दीड वर्षेच (त्यातील आणखी काही महिने कमी होण्याची शक्यता आहे) सेनेला सभापतीपद भोगता येणार आहे. यावरुन भाजपाने सेनेची चांगलीच बोळवण केल्याचे स्पष्ट झाले आहे.