- जमीर काझीमुंबई : दोन वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पोलीस घटकनिहाय लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ५० गुणांची परीक्षा अर्जात नमूद केलेल्या केंद्रावर जाऊन द्यायची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेतली जाणार आहे. घटकनिहाय परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येत असून, उमेदवारांनी नमूद केलेल्या मोबाइल नंबर व ई-मेलवर माहिती कळविली जाणार आहे.२०१९ च्या ५ हजार २९७ रिक्त पदांसाठी ११ लाख ९७ हजार ४१५ इतके अर्ज आले आहेत. त्यावेळी जाहिरातीमध्ये ज्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गांतर्गत (एसईबीसी) अर्ज भरला आहे, त्यांना आर्थिक दुर्बल प्रवर्ग (ईबीसी) किंवा खुल्या गटातून परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्जामध्ये बदल करण्यासाठी ५ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. पोलीस दलाच्या संकेतस्थळावर जाऊन हा बदल करायचा आहे.एसईबीसी प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या ४ लाखांवर आहे. त्यांना खुल्या किंवा ईबीसी प्रवर्गाची निवड करायची असून, ईबीसी अंतर्गतच्या परीक्षा देणाऱ्यांना शारीरिक चाचणीवेळी संबंधित प्रमाणपत्र द्यावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
१२ लाख अर्जराज्यात २०१८ मध्ये कॉन्स्टेबलच्या ६ हजार १०० रिक्त पदांसाठी १० लाख ७४ हजार ४०७ अर्ज आले होते, तर २०१९ मध्ये त्याहून ८०३ पदे कमी असतानाही जवळपास सव्वालाख अधिक म्हणजे ११.९७ लाख इच्छुक आहेत.