Join us

एसटी चालक पदासाठी लेखी परीक्षा ३ मे रोजी

By admin | Published: May 01, 2015 2:29 AM

७ हजार ७६९ पदांसाठी ३३ हजार ५00 उमेदवारांचे अर्ज आले असून त्यांची ३ मे रोजी लेखी परीक्षा घेण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

मुंबई : एसटी महामंडळाकडून कनिष्ठ चालक पदासाठी भरती केली जात आहे. ७ हजार ७६९ पदांसाठी ३३ हजार ५00 उमेदवारांचे अर्ज आले असून त्यांची ३ मे रोजी लेखी परीक्षा घेण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. ही परीक्षा त्या-त्या जिल्ह्यात दुपारी तीन वाजता घेण्यात येणार असून परीक्षेचे प्रवेश पत्र ६६६.ेंँं२३.्रल्ल येथे उपलब्ध आहे. परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत ७७७४0६0९0१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे एसटीकडून आवाहन करण्यात आले आहे. सध्या एसटी महामंडळात ३६ हजार चालक असून या चालकांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळेच ही भरती केली जात असल्याचे सांगण्यात आले. महामंडळाकडून विनावाहक फेऱ्याही मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्या असून त्याचे वाढीव प्रमाण लक्षात घेता या भरतीत चालक कम वाहक असे प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. लेखी परीक्षेनंतर चाचणीही होणार असून साधारणपणे दोन ते तीन महिने हे चालक सेवेत येण्यास लागतील. (प्रतिनिधी)