याचि देही, याचि डोळा पाहा भारतीय युद्धनौकेची भव्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 06:14 AM2019-09-16T06:14:02+5:302019-09-16T06:14:10+5:30
नौदल सप्ताहानिमित्त नौदलातर्फे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा एक भाग असलेल्या युद्धनौका दर्शनाला रविवारी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
मुंबई : नौदल सप्ताहानिमित्त नौदलातर्फे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा एक भाग असलेल्या युद्धनौका दर्शनाला रविवारी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
रविवार हा सुट्टीचा दिवस असूनही अनेक नागरिक सकाळी ९च्या ठोक्याला नौैदलाच्या टायगर गेटवर उपस्थित होते. नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाºयांनी त्यांना युद्धनौकेवर प्रवेश दिला. नौदलाच्या अधिकाºयांनी यावेळी युद्धनौकेच्या विविध विभागांची व कामाची माहिती दिली. युद्धनौकेवर कार्यरत असलेल्या नौसैनिकांच्या कामाबाबत यावेळी माहिती देण्यात आली. युद्धनौकेवर वापरण्यात येणाºया शस्त्रात्रांबाबतदेखील यावेळी नागरिकांना तोंडओळख करून देण्यात आली.
नाौदलाच्या ताफ्यातील युद्धनौकांची पाहणी करण्याची संधी नौदलाने उपलब्ध करुन दिली आहे. पुढील रविवारी, २२ सप्टेंबरला नागरिकांना आणखी एक संधी उपलब्ध असेल, तर शालेय विद्यार्थ्यांना शनिवारी, २१ सप्टेंबर रोजी प्रवेश देण्यात येणार आहे.
>युद्धनौकेपर्यंत
कसे पोहोचाल?
सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत युद्धनौकांना भेट देता येईल. बॅलार्ड इस्टेट येथील नेव्हल डॉकयार्डच्या टायगर गेटमधून यासाठी प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती नौदलातर्फे देण्यात आली. यासाठी कोेणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. प्रवेश करताना मोबाइल, कॅमेरा किंवा बॅग घेऊन आत जाता येणार नाही.