पादचारी पूल, सरकते जिन्यांचा वापर न करता रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट वापरणाºया प्रवाशांना ‘यमराज’ने उचलले. हा ‘यमराज’ म्हणजे सुरक्षा दलाचा जवान आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर महाराष्ट्र सुरक्षा दल आणि रेल्वे सुरक्षा बलाने विशेष मोहीम राबविली. यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानाने यमराजाचा वेश परिधान केला होता. मुंबई सेंट्रल ते विरार दरम्यान यमराज फिरत आहे. माहीम, माटुंगा, दादर, मालाड आणि अंधेरीत रेल्वे रूळ ओलांडणारे प्रवासी जास्त आहेत. ७ नोव्हेंबरला अशा ५०० पेक्षा जास्त प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून रेल्वे रूळ न ओलांडण्याची शपथ घेण्यात आली.
मागील दोन दिवसांपासून रेल्वे रूळ ओलांडणाºया प्रवाशांना यमराज उचलत आहे. रेल्वे रूळ ओलांडणाºया प्रवाशांना तो उठाबश्या काढायला लावतो. रेल्वे रूळ ओलांडणे रेल्वे कायद्यानुसार अपराध आहे. रेल्वे रूळ ओलांडल्यास स्वत:च्या जीवावर बेतू शकते, अशा सूचना ‘यमराज’च्या वेशातील महाराष्ट्र सुरक्षा दलाचा जवान स्वप्निल होनमाने याच्याकडून देण्यात आल्या.