Join us

यारी गल्ली मित्र मंडळाने साकार केला पर्यावरण जागृतीचा देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:09 AM

मुंबई : मुंबई-वर्सोवा, यारी रोड येथील यारी गल्ली मित्र मंडळाचा गणेशोत्सव कोरोना महामारीच्या काळात साधेपणाने तसेच सरकारी निर्णयाचे ...

मुंबई : मुंबई-वर्सोवा, यारी रोड येथील यारी गल्ली मित्र मंडळाचा गणेशोत्सव कोरोना महामारीच्या काळात साधेपणाने तसेच सरकारी निर्णयाचे भान ठेवून साजरा करण्यात येत आहे. मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी ही पारंपरिक १२ फुटांची मूर्ती न ठेवता ४ फुटाच्या गणेशमूर्तीची स्थापना मंडपात केली आहे. सामाजिक बांधिलकी जपताना समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात देखाव्याच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे, असे मंडळाचे अध्यक्ष सतीश परब यांनी सांगितले.

मंडळाच्या वतीने पाणी पृथ्वीवरील अमृत, स्त्रीभ्रूणहत्या, ग्लोबल वॉर्मिंग, अशा अनेक विषयांच्या माध्यमातून लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला. या विषयांना सर्व थरांतून चांगला प्रतिसादही लाभला होता, असे मंडळाचे खजिनदार हृषीकेश कामत यांनी सांगितले.

मंडळाचे अध्यक्ष सतीश परब यांच्या मार्गदर्शनाखाली खजिनदार सचिव - राजेश रासम, सहखजिनदार - शांताराम नेवरेकर, सदस्य - विशाल वाडकर, शैलेश साळवी, प्रकाश म्हात्रे, दत्ता गावंड, चंद्रकांत भागडे, रमेश टोपले आदी मंडळी कोरोनाच्या नियमांचे पालन करत येथील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कार्यरत आहेत.