'वायसीएफ साथी ॲप'द्वारे चित्रपट कामगारांना मदत करणार यश चोप्रा फाऊंडेशन
By संजय घावरे | Updated: February 1, 2024 20:20 IST2024-02-01T20:20:21+5:302024-02-01T20:20:33+5:30
याचा फायदा १५०० हून अधिक नवीन कामगारांनाही घेता येणार आहे.

'वायसीएफ साथी ॲप'द्वारे चित्रपट कामगारांना मदत करणार यश चोप्रा फाऊंडेशन
मुंबई- भारतीय मनोरंजन विश्वातील आघाडीची निर्मितीसंस्था असलेल्या यशराज फिल्म्सच्या यश चोप्रा फाउंडेशनने चित्रपटसृष्टीतील कामगारांच्या मदतीसाठी वायसीएफ साथी अॅप तयार केले आहे. या अंतर्गत कामगारांपर्यंत लवकरात लवकर मदत पोहोचवण्याची यश चोप्रा फाऊंडेशनची योजना आहे.
कामगारांच्या सर्वांगीण विकास आणि उपजीविका उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘साथी’साठी एक सुलभ डिजिटल टूल, वायसीएफ साथी ॲप लाँच करण्यात आले आहे. हिंदी फिल्म फेडरेशनचे नोंदणीकृत सदस्य असलेल्या कामगारांना वायसीएफ साथी अॅपच्या माध्यमातून मदत मिळणार आहे. यशराज फिल्म्सचे अध्यक्ष आणि व्ववस्थापकीय संचालक आदित्य चोप्रा यांनी सिने उद्योगात रोजंदारीवर काम करणारे आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य विमा, शालेय शुल्क भत्ता आणि अन्न शिधा यांसह इतर फायदे देण्यासाठी साथी कार्ड तयार केले होते.
वायसीएफने कोविड-१९ दरम्यान हिंदी चित्रपट कामगारांना मोफत लसीकरण करण्यास मदत झाली होती. वायसीएफने आतापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीतील १५,००० हून अधिक लोकांना मदत केली आहे. ‘वायसीएफ साथी ॲप’द्वारे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. याचा फायदा १५०० हून अधिक नवीन कामगारांनाही घेता येणार आहे.