Join us

यश वाघाचा कर्करोगाने मृत्यू, झुंज ठरली अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 6:08 AM

बोरीवलीच्या नॅशनल पार्कातील (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) १२ वर्षीय यश वाघाचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला.

मुंबई : बोरीवलीच्या नॅशनल पार्कातील (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) १२ वर्षीय यश वाघाचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच त्याला तोंडाच्या स्नायूंचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. त्याच्या तोंडाच्या आतील गाठीचे नमुने तपासणीसाठी विविध प्रयोगशाळांत पाठविण्यात आले होते. यशवर पशू वैद्यकीय तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे उद्याने प्रशासनाने सांगितले.बसंती वाघिणीच्या पोटी जन्मलेला यश हा रॉयल बेंगॉल टायगर प्रजातीचा वाघ होता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात २००८ साली त्याचा जन्म झाला होता. गेल्या वर्षी यशवर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मार्च महिन्यात संसर्गामुळे त्याच्या डाव्या बाजूकडील ओठावर ४०० ग्रॅमची गाठ (गॅ्रनुलोमा) तयार झाली होती. या गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर, यशला तोंडाच्या स्नायूचा कर्करोग झाल्याचेनिदान करण्यात आले होते. तेव्हापासून यशची प्रकृती खालावली होती.दरम्यान, यशच्या मृत्युमुळे बुधवारी दिवसभर सिंह व व्याघ्र सफारी उद्यान प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आली होती. परिणामी पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.>मार्चमध्ये शेवटचा विहारमुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातर्फे बुधवारी यशचे शवविच्छेदन करण्यात आले. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या यशने मार्च, २०१९ मध्ये शेवटचा विहार केला होता. त्यानंतर, तो कायमचा जागेवर बसल्याने त्याचे वजन खूप कमी झाले होते, तसेच बहुतेक अवयव निकामी झाले होते.वन्यजीव जतन तज्ज्ञ डॉ. संतोष गायकवाड हे यशचे टॅक्सीडर्मीतून जतन करणार असल्याचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.>टॅक्सीडर्मी करताना त्याचे जे अवयव निकामी झालेले होते, त्या अवयवांचा अभ्यास केला गेला. अभ्यासानंतर या अवयवांना अग्नी देण्यात आला. ज्या वेळी कर्करोग होतो, तेव्हा तो संपूर्ण शरीरातील अवयवांना निकामी करून टाकतो. त्यामुळे एकाच वेळी सर्व अवयव बंद पडतात. यशच्या तोंडाच्या आतील स्नायूंत कर्करोग झाला होता.- डॉ. मनीष पिंगळे, पशुवैद्यकीय तज्ज्ञ