Lokmat DIA 2021: यशराज मुखातेचा लोकमत ‘बेस्ट व्हायरल कन्टेंट क्रिएटर ऑफ द इयर’ पुरस्कारानं गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 03:25 PM2021-12-02T15:25:52+5:302021-12-02T15:27:34+5:30

Lokmat Digital influencer Awards 2021: ‘रसोडे मै कोन था?’ हे आठवतं तेव्हा माझ्या चेहऱ्यासोबतच यशराजचं नाव आपोआप आठवतं अशा शब्दात अभिनेत्री रुपल पटेल यांनी यशराज मुखातेचं कौतुक केले.

Yashraj Mukhate honored with Lokmat Best Viral Content Creator of the Year Digital influencer award | Lokmat DIA 2021: यशराज मुखातेचा लोकमत ‘बेस्ट व्हायरल कन्टेंट क्रिएटर ऑफ द इयर’ पुरस्कारानं गौरव

Lokmat DIA 2021: यशराज मुखातेचा लोकमत ‘बेस्ट व्हायरल कन्टेंट क्रिएटर ऑफ द इयर’ पुरस्कारानं गौरव

Next

मुंबई – ‘रसोडे में कौन था?’ या टायटलवर मीम बनवणाऱ्या तरुण म्युझिक प्रोड्युसर यशराज मुखाते याला लोकमत बेस्ट व्हायरल कन्टेंट क्रिएटर ऑफ द इयर डिजीटल इन्फ्लूअन्सर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. रातोरात सोशल मीडियावर स्टार बनलेल्या या ध्येयवेड्या तरुणानं स्टार प्लसवरील मालिका साथ निभाना साथिया यातील डायलॉगवर फनी रॅप बनवला होता. हा रॅप तरुणाईला खूप भावला. कोकिलाबेन, गोपी आणि राशी यांच्यावर बनवलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.

यशराजचा हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेता वरुण धवन, राजकुमार अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्याच्या कलेला पसंती दिली. यशराजच्या या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर ३ मिलियनपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले. यशराज मुखातेच्या यूट्यूब चॅनेलला ४८ लाख फोलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर २.२ मिलियन फोलोअर्सची संख्या आहे.   

दरम्यान, यशराज मुखाते इतकं प्रेमळ नाव आहे. कारण ज्याच्या नावात यश आहे त्यांना यशाची प्राप्ती होणारच आहे. ‘रसोडे मै कोन था?’ हे आठवतं तेव्हा माझ्या चेहऱ्यासोबतच यशराजचं नाव आपोआप आठवतं. यशराज यांनी अप्रतिम सुंदर असं काम केले आहे. म्हणून लोकमतसारख्या प्रतिष्ठीत संस्थेकडून त्यांना पुरस्कार मिळत आहे. त्याबद्दल माझ्याकडून खुप साऱ्या शुभेच्छा आहेत. या उमदीने यशराजनं यापुढे काम करावं अशा सदिच्छा त्यांना देते असं शब्दात साथ निभाना साथिया या सिरियलमधील कोकिलाबेन फेम अभिनेत्री रुपल पटेल यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 

कोण आहे यशराज मुखाते?

यशराज मुखाते औरंगाबाद येथील तरुण असून तो सध्या २५ वर्षाचा आहे. औरंगाबादच्या होली क्रॉस शाळेत त्याने १० वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पॉलिटेक्निकचं शिक्षण घेण्यासाठी यशराजनं औरंगाबादच्या MIT कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पॉलिटेक्निक केल्यानंतर यशराज पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी आला. इलेक्ट्रॉनिक अँन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींगची पदवी त्याने घेतली.

लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या यशराजने इंजिनिअरींग पदवी घेतल्यानंतर थेट करिअर बनवण्यासाठी मुंबई गाठली पण काही कारणास्तव त्याला मुंबई सोडून पुन्हा औरंगाबादला जावं लागलं. वयाच्या तिसऱ्या वर्षी यशराजनं त्याच्या वडिलांसोबत एकत्र पहिला स्टेज शो केला होता. शाळेत आणि कॉलेजमध्येही यशराजनं म्युझिकमध्ये अनेक पुरस्कार पटकावले आहेत. यशराजनं त्याच्या राहत्या घरालाच एक स्टुडिओ बनवला आहे. त्याठिकाणी तो म्युझिक प्रॉडक्शनचं काम करतो. यशराजचे वडील बांधकाम व्यावसायिक असूनही उत्तम संगीतकार आहेत. तर आई कापडाचा व्यवसाय करते. यशराजची एक बहिण आर्किटेक्ट आहे. तिचं लग्न झालं आहे.

Web Title: Yashraj Mukhate honored with Lokmat Best Viral Content Creator of the Year Digital influencer award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.