यशश्री शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद कर्नाटकात लपलेला; गुलबर्ग्यातून मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 08:37 AM2024-07-30T08:37:26+5:302024-07-30T08:38:33+5:30

नवी मुंबई पोलिसांनी आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली.

Yashshree Shinde murder accused Dawood Shaikh arrested Found in Guberga, Karnataka | यशश्री शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद कर्नाटकात लपलेला; गुलबर्ग्यातून मुसक्या आवळल्या

यशश्री शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद कर्नाटकात लपलेला; गुलबर्ग्यातून मुसक्या आवळल्या

उरण येथील २० वर्षीय यशश्री शिंदे हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली आहे. आरोपी दाऊद शेखला मुंबईपोलिसांनी कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर येथून ताब्यात घेतले आहे. त्याला नवी मुंबई आणले जात आहे. मागील चार दिवसापासून नवी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला होता. नवी मुंबई पोलिसांनी ५ पथके केली होती. हत्येनंतर २५ जुलै रोजी तो फरार झाला होता. दाऊद शेखचे शेवटचे लोकेशन कर्नाटकातील होते. यावरुन त्याचा तपास करण्यात आला आहे. 

२५ जुलै रोजी यशश्री शिंदे हिची हत्या आरोपी दाऊद शेखने केली होती. यानंतर तो फरार झाला होता. यशश्री शिंदेच्या कुटुंबियांनी दाऊद शेख याच्यावरतीच संशय व्यक्त केला होता. 

यशश्री शिंदे गुरुवारी बेपत्ता झाली होती

उरण येथे राहणाऱ्या २० वर्षीय यशश्री शिंदे गुरुवारी बेपत्ता झाली होती. तिचा शोध पोलिसांकडून सुरू होताच त्यातच शुक्रवारी रात्री उशीरा एका पेट्रोल पंपाजवळील निर्जनस्थळी युवतीचा मृतदेह आढळला. हा मृतदेह यशश्रीचा असल्याचं निष्पन्न झालं. या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करणारे डॉक्टरही तिची अवस्था पाहून हादरले. यशश्रीच्या प्रायव्हेट पार्टला मोठी जखम होती. शरीरावर अनेक वार केले होते. तिचा निर्घृण खून केल्याचं उघड झालं.

या घटनेत दाऊद शेख नावाच्या आरोपीची ओळख पटली होती.  त्याने यशश्रीवर लैंगिक अत्याचार केले होते. वयाच्या १५ व्या वर्षी यशश्रीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला पॉक्सो अंतर्गत जेल झाली होती. जेलमधून बाहेर येऊन त्याने यशश्रीसोबत जे केले ते ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल. यशश्री शिंदे कॉमर्सचं शिक्षण घेत होती. शिक्षणासह ती खासगी कंपनीत डेटा ऑपरेटर म्हणून काम करायची. गुरुवारी ती आई वडिलांना बाहेर जाते सांगून घरातून निघाली आणि तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. रात्री उशीरापर्यंत मुलगी परतली नाही तेव्हा वडिलांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. 

कोटनाका परिसरात रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली

शुक्रवारी रात्री उरण पोलीस स्टेशनच्या पथकाला एक कॉल आला. त्यात कोटनाका परिसरात रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात मुलीचा मृतदेह पडला असून कुत्रे तिच्या शरीराचा चावा घेत होते. कुत्र्यांमुळे मुलीचा चेहरा विद्रुप झाला होता. तिच्या खांद्यावरील मांसही कुत्र्यांनी खाल्लं. तिच्या कमरेवर आणि पाठीवर चाकूचे ३ वार होते. यशश्री शिंदे बेपत्ता प्रकरण पाहता तिच्या आई वडिलांना बोलवण्यात आले. तेव्हा मुलीचे कपडे आणि तिच्या शरीरावर टॅटूने तिची ओळख पटली. पीडित मुलीच्या आई वडिलांनी संशयित म्हणून दाऊद शेखचं नाव पोलिसांना सांगितले.

Web Title: Yashshree Shinde murder accused Dawood Shaikh arrested Found in Guberga, Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.