Join us

स्थायी समिती अध्यक्षपदी यशवंत जाधव; शिक्षण समिती अध्यक्षपदी मंगेश सातमकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 5:17 AM

मुंबई महापालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावत असलेल्या भाजपाने शिवसेनेसमोर नमते घेतले; आणि स्थायी समितीसह शिक्षण समिती अध्यक्षपदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात पडली.

मुंबई - मुंबई महापालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावत असलेल्या भाजपाने शिवसेनेसमोर नमते घेतले; आणि स्थायी समितीसह शिक्षण समिती अध्यक्षपदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात पडली. विशेषत: भाजपाच्या नरमाईच्या भूमिकेमुळे दोन्ही समित्यांवर शिवसेनेची वर्णी लागल्याने आता राजकीय चर्चांना आणखी उधाण आलेआहे.महापालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर यशवंत जाधव यांच्या नावाची गुरुवारी घोषणा करण्यात आली. तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदावर मंगेश सातमकर चौथ्यांदा निवडून आले आहेत. या दोन्ही पदांसाठी विरोधी पक्षाकडून एकही अर्ज आला नाही. परिणामी जाधव व सातमकर यांची बिनविरोध निवड झाली. यशवंत जाधव १९९७ मध्ये पहिल्यांदा नगरसेवकपदी निवडून आले. २०००-०१ मध्ये स्थापत्य समिती अध्यक्षपद त्यांनी भूषविले. २००७ मध्ये नगरसेवकपदी ते पुन्हा निवडून आले. त्या वर्षी त्यांची उद्यान व बाजार समिती अध्यक्षपदी वर्णी लागली. मात्र २०१२ मध्ये त्यांचा प्रभाग महिला आरक्षणात गेला. या काळात त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी यामिनी जाधव निवडून आल्या होत्या. २०१७ मध्ये जाधव पुन्हा निवडून आले व पहिल्याच वर्षी त्यांना सभागृह नेतेपद मिळाले. अध्यक्षीय भाषणात, महापालिकेचा महसूल वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मालमत्ता कर थकविणाºयांवर सुरू असलेली दंडात्मक व दर्जाच्या कारवाईचे त्यांनी समर्थन केले.चार वेळा निवडून येण्याचा मानमहापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निवडून येण्याचा मान मंगेश सातमकर यांना मिळाला आहे. शिक्षण समिती अध्यक्षपदावर चारवेळा निवडून येणारे ते पहिलेच नगरसेवक आहेत. १९९४ मध्ये पोटनिवडणुकीत ते पहिल्यांदा निवडून आले होते. २००२ ते २०१२ या काळातील नगरसेवकपदाच्या कारकिर्दीत त्यांनी तीनवेळा शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषविले. सुगंधित दूध योजना, २७ शालेय वस्तू अशा योजना त्यांनी जाहीर केल्या होत्या. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबईशिवसेना