यंदा २१ कोटी ‘खड्ड्यात’
By admin | Published: December 22, 2015 02:08 AM2015-12-22T02:08:15+5:302015-12-22T02:08:15+5:30
पावसाळापूर्व कामांची डेडलाइन उलटूनही खड्डे बुजवण्याचे काम करण्याचा मुंबई महापालिकेचा लौकिक आहे. यंदा मात्र महापालिका ‘आॅन टाइम’ कामाला लागली आहे़
मुंबई : पावसाळापूर्व कामांची डेडलाइन उलटूनही खड्डे बुजवण्याचे काम करण्याचा मुंबई महापालिकेचा लौकिक आहे. यंदा मात्र महापालिका ‘आॅन टाइम’ कामाला लागली आहे़ त्यानुसार मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी संभाव्य २१ कोटींच्या खर्चाची
तरतूद करण्यात आली आहे. तथापि, निविदा प्रक्रियेतील विलंबाचा इतिहास पाहता यंदाची तरी डेडलाइन पाळली जाईल का? याबाबत साशंकताच आहे़
पावसाळापूर्व कामांसाठी ३१ मे २०१६ ही डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे़ त्यानुसार नाल्यांची सफाई आणि रस्त्यांची कामे प्राधान्याने उरकणे अपेक्षित असते़ निविदा प्रक्रिया वेळेत सुरू झाल्यानंतरही अनेक वेळा खड्डे बुजविण्याचे काम सुरू होण्यास विलंब होतो़ परिणामी, ऐन पावसाळ्यात सुरू असलेल्या या कामांमुळे मुंबईकरांची दैना उडते़ त्याचबरोबर खड्डेदुरुस्तीचा खर्चही वाढत जातो़
ही चूक सुधारण्यासाठी यंदा पालिकेने खड्डेदुरुस्तीच्या कामासाठी डिसेंबर महिन्यातच निविदा मागविली आहे़ यामध्ये प्रामुख्याने वांद्रे, अंधेरी आणि बोरीवली या विभागांना प्राधान्य देण्यात आले आहे़ या विभागातून खड्ड्यांच्या तक्रारी सर्वाधिक असल्याने येथे विशेष लक्ष देण्यात येणार
आहे़ (प्रतिनिधी)