Join us

या वर्षी २७ दिवस धोक्याचे

By admin | Published: April 29, 2015 2:08 AM

जीवनवाहिनी असलेल्या रेल्वे सेवेला लागणारा ब्रेक आणि वाहतुकीची कोंडी अशा समस्यांमुळे प्रत्येक पावसाळा धडकी भरविणाराच ठरतो़

मुंबई : जीवनवाहिनी असलेल्या रेल्वे सेवेला लागणारा ब्रेक आणि वाहतुकीची कोंडी अशा समस्यांमुळे प्रत्येक पावसाळा धडकी भरविणाराच ठरतो़ यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतले २७ दिवस मुंबईकरांना त्रासदायक ठरू शकतील. या दिवसांमध्ये समुद्राला उधाण असेल आणि त्यात ४़५ मीटरहून उंच लाटा उसळतील. या ऐन भरतीत मुसळधार पाऊस पडल्यास ते क्षण मुंबईकरांना धोक्याचे ठरू शकतील. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे़ मात्र पंपिंग स्टेशनचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने आजही ४० सखल भाग हमखास पाण्याखाली जातात़ समुद्रामध्ये ४़५ मीटरहून मोठी भरती असल्यास मुंबईत हमखास पाणी तुंबते़ त्यामुळे अशा धोक्याच्या दिवशी नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी़ खबरदारीसाठी या दिवसांची यादी जाहीर करण्यात येते़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा धोक्याचे सहा दिवस अधिक असणार आहेत़ तर ४़६० मीटरहून अधिक उंच लाटा उसळणारे ९ दिवस आहेत़ सर्वाधिक ८ धोक्याचे दिवस आॅगस्ट महिन्यात आहेत़ ३१ आॅगस्ट रोजी या वर्षीची सर्वात मोठी ४़८७ मीटर लाट समुद्रात उसळणार आहे़ यामुळेच मोठ्या भरतीचा धोका़़़़ मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ताशी ५० मि़मी़ पावसाचे पाणी वाहून नेण्याची आहे़ मात्र मोठ्या भरतीच्या दिवशी समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटा पाणी बाहेर फेकत असतात़ अशावेळी पाऊस पडल्यास मुंबईत पाणी तुंबते़ २००९मध्ये १०० वर्षांतील सर्वात मोठी भरती मुंबईने अनुभवली़ जून महिनातारीखवेळलाटांची उंची(मीटर्समध्ये)०४ १३़३६४़५४०५ १४़१८४़५८०६ १५़०२४़५६१५ ११़३९४़५११६१२़२३४़६११७ १३़०६४़६११८१३़४८४़५६जुलै महिना०३१३़१८४़६२०४ १४़००४़७२०५ १४़४४४़७५०६ १५़२९४़६८०७१६़१५४़५१३११२़१३४़५२आॅगस्ट महिनातारीखवेळलाटांची उंची(मीटर्समध्ये)०१ १२़५५४़७२०२१३़३७४़८४०३ १४़२०४़८६०४ १५़०४४़७५०५ १५़५०४़५१२९ ११़४७४़५७३०१२़२९४़७७३११३़०९४़८७सप्टेंबर महिना०११३़५३४़८३०२१४़३६४़६६२७११़२१४़५४२८१२़०३४़७१२९१२़४५४़७५३०१३़२६४़६७