पाडव्यानिमित्त यंदा ४९ शोभायात्रा
By admin | Published: March 20, 2015 10:51 PM2015-03-20T22:51:26+5:302015-03-20T22:51:26+5:30
गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेची परंपरा डोंबिवलीकरांकडून जरी लाभली असली, तरी या शोभायात्रेची धूम ठाणे जिल्ह्यात सर्वत्र पसरली आहेत.
ठाणे : गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेची परंपरा डोंबिवलीकरांकडून जरी लाभली असली, तरी या शोभायात्रेची धूम ठाणे जिल्ह्यात सर्वत्र पसरली आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात लहान-मोठ्या ४९ शोभायात्रांची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागांत त्याची मोठी क्रेझ आहे. शहरी भागांत तब्बल ४१ शोभायात्रा काढून गुढीपाडवा साजरा होणार आहे. या वेळी चित्ररथांद्वारे सामाजिक संदेशही दिले जाणार आहेत. तसेच दुसरीकडे पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली आहे.
मराठी नववर्ष अत्यंत उत्साहामध्ये साजरे करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागांतील काही संस्थांनी जोरदार तयारी केली आहे. ठाणे शहरामध्ये पाडव्याच्या पूर्वसंध्येपासूनच विविध कार्यक्र म सुरूही झाले आहेत. तर, गुढीपाडव्याला सकाळी शहर पोलीस आयुक्तालय परिसरात ४१ शोभायात्रा निघणार आहेत. त्यामध्ये १३ मोठ्या आणि २८ लहान तर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात १ मोठी तर ७ लहान शोभायात्रांचे आयोजन केले आहे. तसेच पाडव्यानिमित्त पडघ्यात शोभायात्रा नाहीतर जत्रा भरणार आहे. या शोभायात्रांमध्ये शेकडो चित्ररथ सहभागी होणार असून त्याद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.
(प्रतिनिधी)
हजारो पोलीस सज्ज
शोभायात्रेदरम्यान दिवसेंदिवस वाढणाऱ्या तरुणाईचा प्रतिसाद लक्षात घेऊन त्यादृष्टीने सुरक्षितेसाठी शहर पोलिसांनी विशेष बंदोबस्त लावला आहे. स्थानिक पोलीस स्टेशनसह अतिरिक्त फौज तैनात राहणार आहे. यामध्ये ८ पोलीस निरीक्षक, २४ सहायक पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक, ६३५ पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्या असा अतिरिक्त बंदोबस्त असेल.
परिमंडळमोठ्यालहानएकूण
ठाणे शहर०४०६१०
भिवंडी०१०२०३
कल्याण०४०६१०
उल्हासनगर०४०२०६
वागळे इस्टेट००१२१२
एकूण१२२८४१
विभागमोठ्यालहान एकूण
मुरबाड०००३०३
मीरा रोड०१०२०३
शहापूर०००१०१
गणेशपुरी०१०००१
एकूण ०२०६०८