- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९८ दिवसांचा जलसाठा आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे.दोन वर्षांपूर्वी पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे गेल्यावर्षी मुंबईत ‘पाणी’बाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. वर्षभर पाणीकपातीचा सामना मुंबईकरांना करावा लागला होता. मात्र, गेल्यावर्षी तलाव परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा पाण्याचे टेन्शन मिटले आहे. मधल्या काळात मध्य वैतरणा जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईला दररोज ३ हजार ७५० दशलश लीटर पाणीपुरवठा केला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली असून, घामाच्या धारा वाहत आहेत. मात्र, पाण्यासाठी वणवण करावी लागत नाही, हाच मुंबईकरांना दिलासा आहे. सद्यस्थितीत तलावांमध्ये ३ लाख ६७ हजार ९९१ दशलश लीटर जलसाठा आहे. तीन महिने मुंबईची तहान भागेल, एवढा हा जलसाठा असल्याने जुलैपर्यंत पाण्याची चिंता नाही.असा आहे साठा (आकडेवारी दशलक्ष लीटरमध्ये)वर्षजलसाठा२०१७३ लाख ६७ हजार ९९१२०१६२ लाख ४१ हजार ३६६२०१५२ लाख ९६ हजार ४६०३,७५० दशलक्ष लीटर्स दररोज पाणीपुरवठा मुंबईला होतो.४,२00 दशलक्ष लीटर्स एवढी दररोज मुंबईत पाण्याची मागणी आहे.२५-३० टक्के म्हणजे दररोज सुमारे नऊशे लीटर्स पाणीगळती व चोरीमध्ये वाया जात आहे.