यंदा ‘सायलंट गरब्या’ची क्रेझ!, तरुणाईची जोरदार पसंती : मालाड, अंधेरी, वांद्रे, कुलाबा भागात आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 06:59 AM2017-09-15T06:59:56+5:302017-09-15T07:00:22+5:30

अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरचे ‘द ब्रेकअप साँग’ तुमच्या लक्षात असेलच. त्या गाण्यात जसे हेडफोन्स लावून डान्स करतात तसेच तुमच्या प्रियजनांसोबत नवरात्रीत नियम न मोडता तरुणाईला ‘अनलिमिटेड’ गरबा डान्स करण्याची इच्छा नक्कीच असेल; आणि ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

 This year, 'Sealant Garbya' craze!, A strong choice for youth: organizing Malad, Andheri, Bandra and Colaba areas | यंदा ‘सायलंट गरब्या’ची क्रेझ!, तरुणाईची जोरदार पसंती : मालाड, अंधेरी, वांद्रे, कुलाबा भागात आयोजन

यंदा ‘सायलंट गरब्या’ची क्रेझ!, तरुणाईची जोरदार पसंती : मालाड, अंधेरी, वांद्रे, कुलाबा भागात आयोजन

 मुंबई : अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरचे ‘द ब्रेकअप साँग’ तुमच्या लक्षात असेलच. त्या गाण्यात जसे हेडफोन्स लावून डान्स करतात तसेच तुमच्या प्रियजनांसोबत नवरात्रीत नियम न मोडता तरुणाईला ‘अनलिमिटेड’ गरबा डान्स करण्याची इच्छा नक्कीच असेल; आणि ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण यंदा ‘सायलंट गरब्या’ची क्रेझ असून, शहर-उपनगरात याचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होत आहे. त्यामुळे यंदा बिनदिक्क्तपणे कितीही वेळ गरबा आणि दांडीयाचा आनंद यंगस्टर्सना लुटता येणार आहे.
सायलंट गरबा आणि दांडीया रासमध्ये सहभागी होणाºयांना थेट हेडफोन्स लावून गरब्याचा आनंद घेता येईल. त्यामुळे लाउडस्पीकरऐवजी गाणे ऐकण्यासाठी हेडफोन्सचा वापर केला जाणार आहे. मालाड, अंधेरी, वांद्रे, कुलाबा अशा काही भागांत या सायलंट गरब्याचे आयोजन केले जात आहे. या अनोख्या ट्रेंडला तरुणाईचे ‘लाइक्स’ मिळत आहेत. यातील काही आयोजनांमध्ये आयोजकांनी शक्कल लढवित हेडफोन्सला तीन ट्रॅक असतील अशी सोय केली आहे. यात बॉलीवूड गरबा गाणी, पारंपरिक गुजराती गरबा गाणी आणि फ्यूजन ट्रॅक अशा विविध प्रकारच्या संगीतावर एकाच वेळी थिरकण्याची संधी आहे. यामुळे सहभागी होणाºयांना आवडत्या ट्रॅकवर स्विच करून डान्स करता येणार आहे.

क्लासेसही सुरू : गेल्या काही वर्षांपासून नवरात्रौत्सवापूर्वी शहर-उपनगरात गरबा, दांडीयाचे प्रशिक्षण देणारे अनेक क्रॅश कोर्स सुरू होतात. यंदा यात भर पडून ‘सायलंट गरब्या’चे क्लासेसही सुरू झाले आहेत. गमतीचा भाग म्हणजे यात मोबाइल्सचे इअरफोन्स लावून तरुणाई सराव करताना दिसतेय. शिवाय, यात गरब्याच्या वेळी अचूकता येण्यासाठी नवनवीन आणि हटके डान्सस्टेप तरुणाई करून पाहत आहे. शिवाय, या सायलंट गरब्याची प्रॅक्टीस घरच्या घरी करणेही शक्य आहे. एखादे गरब्याचे गाणे लावून घरच्या घरीही हा सराव करणे सोपे होईल. त्याचप्रमाणे, यूट्युबवरही गरब्याचे प्रशिक्षण देणारे अनेक व्हिडीओज् पाहायला मिळत आहेत.

Web Title:  This year, 'Sealant Garbya' craze!, A strong choice for youth: organizing Malad, Andheri, Bandra and Colaba areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.