Join us

यंदा दहीहंडीत ध्वनिप्रदूषण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:58 AM

दहीहंडी उत्सवात सर्वत्र डीजे, लाउडस्पीकर्स, घोषणा, गाणी आणि गोंधळाचे वातावरण असते.

अक्षय चोरगे ।मुंबई : दहीहंडी उत्सवात सर्वत्र डीजे, लाउडस्पीकर्स, घोषणा, गाणी आणि गोंधळाचे वातावरण असते. कर्कश आवाजाने सामान्यांना अनेकदा त्रासही सहन करावा लागतो. या आवाजाचे मोजमाप केले तर ते १०० ते १२५ डेसिबलपर्यंत असते; परंतु यंदा मात्र डेसिबलचे मीटर अनेक ठिकाणी १०० च्याही खाली आल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी होते. काही ठिकाणी डेसिबलचा काटा १००च्या पुढे गेला खरा; पण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ध्वनिप्रदूषण कमी असल्याचे आवाज फाउंडेशनने नमूद केले.वांद्रे, दादर, शिवाजी पार्क, सेना भवन, जांबोरी मैदान, वरळी, वांद्रे हिल रोड परिसरांत आवाज फाउंडेशनने सर्वेक्षण केले. शहरात दहीहंडीच्या आसपासच्या परिसरात ७० ते ११३ डेसिबल एवढी ध्वनिप्रदूषणाची नोंद करण्यात आली. डीजेंचा सुरू असलेला संप, अनेक मोठ्या आयोजकांनी दहीहंडीच्या आयोजनातून घेतलेली माघार, प्रशासन व्यवस्थेचे कडक नियम, पोलिसांचा वचक आणि अनेक संस्था व प्रशासनाने केलेल्या जनजागृतीमुळे ध्वनिप्रदूषणाचा मीटर थोडा खाली उतरल्याचे आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितले; परंतु अद्याप ‘ध्वनिप्रदूषणमुक्त मुंबई आणि ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सव’ साजरे करण्याचे ध्येय गाठायचे असल्याचेही त्यांनी सांगितले.>शेलारांकडून सर्वाधिक ध्वनिप्रदूषण :भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी वांद्रे येथे आयोजित केलेल्या दहीहंडीजवळ शहरातील सर्वांत जास्त ध्वनिप्रदूषणाची नोंद करण्यात आली. त्या ठिकाणाजवळ ११३ डेसिबल एवढे ध्वनिप्रदूषण झाल्याचे आवाज फाउंडेशनकडून सांगण्यात आले आहे.>विविध ठिकाणांवरील ध्वनिप्रदूषणठिकाणाचे नाव प्रदूषणाचा स्रोत प्रदूषणशिवसेना भवन गर्दीचा दंगा, शिट्ट्या ८८दादर स्थानक परिसर माइकवरील सूचना ८६जांबोरी मैदान गर्दी, वाहतूककोंडी ७२वरळी नाका ताशा पथक १०१वांद्रे, हिल रोड लाउड स्पीकर्स, गोंधळ ११३