Join us

यंदा पुरणपोळीलाही बसणार पाणीटंचाईचा चटका

By admin | Published: March 17, 2016 2:44 AM

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने आठवड्यातून तीन दिवस पाणीकपात लागू केली आहे. त्याचा फटका नागरी वस्तीसह उद्योगांना बसला आहे. होळी तोंडावर आली आहे.

- जान्हवी मोर्ये, डोंबिवली पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने आठवड्यातून तीन दिवस पाणीकपात लागू केली आहे. त्याचा फटका नागरी वस्तीसह उद्योगांना बसला आहे. होळी तोंडावर आली आहे. त्यानिमित्त गृहउद्योग, पोळीभाजी केंद्रे तसेच घरी अनेक जण पुरणपोळी व्रिकीचा व्यवसाय करतात. परंतु, यंदा त्यांना पाणीकपातीची झळ बसत आहे. त्यामुळे पुरणपोळीच्या विक्रीत २५ टक्के घट दिसून येणार आहे.डोंबिवलीतील प्रसिद्ध हलवाई श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले की, पाणीटंचाईचा फटका सगळ्यांना बसत आहे. त्याचप्रमाणे आमच्या व्यवसायाला बसला आहे. होळीला मोठ्या प्रमाणावर आम्ही पुरणपोळ्या विकतो. परंतु, यंदा पाणीटंचाईमुळे पुरणपोळ्या जास्त प्रमाणात करता येणार नाहीत. पुरणपोळीसाठी डाळ शिजवणे, पुरण तयार करणे यासाठी भांडी लागतात. पोळ्यांची जास्त प्रमाणात आॅर्डर असल्यास भांडीही आकाराने मोठी व खूप लागतात. त्यासाठी पाणीही जास्त लागते. पाणीटंचाईमुळे तीन दिवस पाणी येत नाही. पाण्याच्या एका खाजगी टँकरचा भाव एक हजार ६०० रुपये आहे. टँकरचे पाणी विकत घेतल्यास पुरणपोळीची किंमत वाढेल. त्यामुळे यंदाच्या वर्षी २५ टक्के कमी पुरणपोळ्या बाजारात येतील. दरवर्षी आम्ही तीन हजार पुरणपोळ्या तयार करतो. त्याला मागणीही जास्त असते. सध्या एका पुरणपोळीची किंमत १८ ते २० रुपये दरम्यान आहे. एका आंबापोळीसाठी २४ रुपये आकारले जातात. आंबापोळीपेक्षा साध्या पुरणपोळीला जास्त मागणी असते. पाण्यासाठी दर वाढवणे शक्य नाहीहोळीनिमित्त डोंबिवलीत १५ हजार पुरणपोळ्या विकल्या जातात. डाळीचे भाव स्थिरावले असले तरी पाण्यामुळे पुरणपोळ्या जास्त प्रमाणात करता येत नाहीत. पाण्यासाठी दर वाढविता येत नाही. त्याऐवजी कमी पुरणपोळ्या करणे, हा मध्यममार्ग आम्ही निवडला आहे.