भातसानगर : मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पातळी काही दिवसांपूर्वी झपाट्याने खालावत होती. यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट येऊ घातलेले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत पातळी कमी होऊ नये, यासाठी प्रयत्न केल्याने आता पाणीपातळी कक्षेत आली आहे. परिणामी, यंदा मुंबईची पाणीकपात टळण्याची शक्यता आहे.एप्रिल महिन्यात भातसातील पाणीपातळी गेल्या वर्षीच्या पातळीच्यादेखील खूपच खाली गेली होती. त्यामुळे यंदा पाणीकपातीची चिंता भेडसावत होती. मात्र, भातसा धरणाचा कालवा फुटल्यानंतर १० ते १२ दिवस शेतीला पाणी बंद करण्यात आले होते. सध्या शेतीची कामे असतानादेखील हे पाणी बंद ठेवल्याने शेतीसाठीच्या पाण्याचा अतिरिक्त साठा धरणात राहिल्याने ही तूट भरून निघाली. त्यामुळेच यंदादेखील गेल्या वर्षीच्या पाणीपातळीची बरोबरी झाली आहे.
यंदा मुंबईची पाणीकपात टळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 5:14 AM