यंदा लोकरीच्या कंदीलाची नवलाई

By admin | Published: October 31, 2015 10:34 PM2015-10-31T22:34:06+5:302015-10-31T22:34:06+5:30

दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठा कंदीलाच्या रोषणाईने उजळल्या आहेत. यावर्षी या कंदीलांमध्ये पायनापल मटकी, दीपस्तंभ, फुलदाणी कंदील आदी

This year, Woolari's Kandilachchi Navalai | यंदा लोकरीच्या कंदीलाची नवलाई

यंदा लोकरीच्या कंदीलाची नवलाई

Next

- भाग्यश्री प्रधान,  ठाणे
दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठा कंदीलाच्या रोषणाईने उजळल्या आहेत. यावर्षी या कंदीलांमध्ये पायनापल मटकी, दीपस्तंभ, फुलदाणी कंदील आदी प्रकारच्या कंदीलांची बाजारात चलती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यावर्षी या कंदीलांची किंमत मागील वर्षीच्या तुलनेत स्थिर आहे. मात्र दिवाळीच्या दोन दिवस आधी त्या वधारतील. मात्र कंदील बनविण्यासाठी लागणारी सर्वच सामुग्री २ ते ४ टक्कयांनी महागली असल्याचेही नमूद केले.
हे कंदील १५ रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. एकावर एक तीन किंवा पाच कंदील मिळून एक दीपस्तंभ तयार होतो. अशाप्रकारचे दीपस्तंभ यंदा प्रथमच बाजारात आले आहेत. या कंदीलांची खरेदी सोसायटीत तसेच रस्त्यावर लावण्यासाठी अधिक खरेदी केले जात आहेत.
काही दुकानात कागदांचा वापर कमी करून कापड, ज्यूट, बांबूच्या मॅट, चटई, गोंडे, लेस, झालर आदी वापरून ते बनविले आहेत. विशेष म्हणजे मुकबधीर मुलांना ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडून हे काम करवून घेतले जाते. हे हे काम सप्टेंबर पासून सुरू झाले होते. त्यामुळे त्यांना भविष्यातही स्वत:चा रोजगार निर्माण करता येईल असे कैलास देसले यांनी सांगितले.
या शिवायबाजारात हॅन्डमेड पेपरने बनवलेले कंदील पाहायला मिळत आहे. पूर्वी धागा वापरून जे कंदील बनवले जात होते. त्या ऐवजी आता लोकरीपासून बनविलेले कंदील आले आहेत. ते साधारण २०० ते ४०० रुपयांपर्यंत मिळतात. काहीजण घराच्या बाल्कनीत छोट्या कंदीलाची माळ तयार करतात त्यासाठी चांदणी आणि मिनी कंदीलही बाजारात आले आहेत. छोटी चांदणी १० रुपयाला एक मिळत आहे. तर चकचकीत कागदापासून चौकोनी आकारात तयार केलेल्या एका कंदीलाची किंमत ३० रुपये आहे. लाकडी काठ्यावर काच, डायमंड यांनी वर्क केलेले कंदीलही पहायला मिळत आहेत. यंदाही चायनीज कंदीलांनी बाजारपेठेत अग्रस्थान पटकावले आहे.

- विविध प्रकारचे हे कंदील ३०० रुपयांपासून ३००० रुपयांपर्यंत मिळत आहेत. त्याचा लुक एखाद्या झुंबराप्रमाणे आहे.त्यामुळे काही ग्राहकांनी त्यातच बल्ब सोडून त्याचा कंदील म्हणून वापर केला जातो असा एक नवीन ट्रेंडही बाजारात आला आहे. ग्राहक विविधतेला प्राधान्य देतात तसेच तो फोल्डिंगचा असेल तर तो लवकर विकत घेतला जातो. कारण तो दिवाळीनंतरही जपून ठेवता येतो.

Web Title: This year, Woolari's Kandilachchi Navalai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.