'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 11:03 AM2020-07-27T11:03:05+5:302020-07-27T14:28:10+5:30
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्तानं सर्व राजकीय नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत आहेत. यातच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.
"ये दोस्ती....हम नही तोडेंगे...आपण आमच्या आयुष्यात खास आहात...आपणास वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे.." असे ट्विट करत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आहेत.
ये दोस्ती....
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 27, 2020
हम नही तोडेंगे...
आपण आमच्या आयुष्यात खास आहात...
आपणास वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे..@uddhavthackeray@CMOMaharashtrapic.twitter.com/3HA5puJzBb
दुसरीकडे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही भावनिक ट्विट करत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "२६ वर्षांपासून मी ज्या व्यक्तीसाठी काम करतोय, त्यांचा आज वाढदिवस! शिवेसना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री हा तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. तुमच्या शांत आणि संयमी नेतृत्त्वाखाली काम करण्याची संधी मिळाली, यातच मी माझं भाग्य समजतो" असे ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केले आहे.
२६ वर्षांपासून मी ज्या व्यक्तीसाठी काम करतोय, त्यांचा आज वाढदिवस! शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री हा तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. तुमच्या शांत व संयमी नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली यातच मी माझे भाग्य समजतो.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) July 26, 2020
वाढदिवसाच्या शुभेच्छा साहेब🙏🏼#HappyBirthdayUddhavThackeraypic.twitter.com/mVrNc2LjY2
दरम्यान, यंदा कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यालय किंवा मातोश्री या निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह करु नका. वाढदिवसाला पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा. या संकटात जनआरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मादान यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्या. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करु नका आणि फलक लावू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
आणखी बातम्या...
'लालू-कवच' असताना सुशीलकुमार मोदींनी कोरोनाला घाबरू नये - राबडी देवी
आपले प्रेरणादायी शब्द उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
पब्जीसह २७५ चिनी अॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत
'हत्ती' vs. 'हात'; सरकारच्या विरोधात मतदान करा; बसपाच्या व्हिपने वाढवली काँग्रेसची डोकेदुखी