मुंबई : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले आहे. त्यामुळे राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूर हिला लंडनला जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
येस बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राणा कपूर यांच्यासह त्यांचे कुटुंब सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहे. राणा कपूर यांची मुलगी रोशणी कपूर भारत सोडून जाण्याच्या तयारीत होती. रोशनी कपूर मुंबई विमानतळावरून लंडनला जात होती. मात्र, तिला मुंबई विमानतळावर रोखण्यात आले. तर राणा कपूर यांचे जावई आदित्य यांच्याविरोधातही लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) शनिवारी कसून चौकशी करण्यात आली. सुमारे 20 तास चाललेल्या चौकशीत बँकेची बेकायदेशीर कर्ज प्रकरणे, बेनामी व्यवहार याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आले.
चौकशी केल्यानंतर पहाटे 4 च्या सुमारास राणा कपूर यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राणा कपूर यांची ईडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष सुट्टीकालीन न्यायालयाने राणा कपूर यांना 11मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.
आणखी बातम्या
अभिमानास्पद! कोल्हापुरच्या सौख्या इनामदारने रचला इतिहास
Corona Virus: अजित पवारांनीही घेतला कोरोनाचा धसका; 'अशी' घेतात काळजी
शरद पवारांबाबत सांभाळून बोला; चंद्रकांत पाटलांना भुजबळांचा इशारा
'आर्ची'च्या झिंगाटने निर्भया मरेथॉनला रंगत; अजिंक्य रहाणे, जितेंद्र जोशी यांचाही विशेष सहभाग