येस बँक ठेवी प्रकरणी दोषी ठपका; विद्यापीठाच्या ‘त्या’ अधिकाऱ्याला पाठविले सक्तीच्या रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 01:25 AM2020-08-26T01:25:01+5:302020-08-26T01:25:13+5:30

पुरस्कार विद्यापीठाने घेतला परत

Yes Bank Deposit Case Convicted; Sent to ‘that’ officer of the university on compulsory leave | येस बँक ठेवी प्रकरणी दोषी ठपका; विद्यापीठाच्या ‘त्या’ अधिकाऱ्याला पाठविले सक्तीच्या रजेवर

येस बँक ठेवी प्रकरणी दोषी ठपका; विद्यापीठाच्या ‘त्या’ अधिकाऱ्याला पाठविले सक्तीच्या रजेवर

googlenewsNext

मुंबई : मुंबई विद्यापीठाची सिनेट बैठक मंगळवारी , २५ आॅगस्ट रोजी आॅनलाईन पद्धतीने पार पडली. येस बँकमध्ये १४० कोटींच्या ठेवलेल्या ठेवीचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर त्यासाठी नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल पटलावर ठेवण्यात आला.
सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संबंधित व्यक्तीचा गुणवंत अधिकारी पुरस्कार परत घेण्यात आला आणि सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.

सदस्यांनी महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अ‍ॅक्ट २०१६ मधील कलम ९४ (२)अंतर्गत गठीत केलेल्या समितीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. १४० कोटींच्या ठेवीचा प्रकार घडत असताना फायनान्स आणि अकाउंट समिती शांत का होती? हे प्रश्न उपस्थित केले.
या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी चौकशी टप्पा २, म्हणजेच संबंधित व्यक्तीवर एफआयआर नोंदवून त्याच्याकडून या प्रकरणांमध्ये कोण कोण व्यक्ती समाविष्ट आहेत यांचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. आणि म्हणून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून यातील अधिक सत्य बाहेर काढावे, अशी मागणी युवासेनेचे प्रदीप सावंत, बुक्टूचे डॉ.गुलाबराव राजे यांनी केली. आदर्श कर्मचारी पुरस्कारही स्थगित करण्यास भाग पाडले.

सिनेट सदस्यांचा आवाज म्यूट
विद्यार्थ्यांच्या सोईसुविधा पुरवणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, शैक्षणिक कार्यक्रम राबवणे अशा अनेक महत्त्वाच्या बाबींसंदर्भातील प्रश्न विद्यापीठांच्या सिनेटमध्ये सोडवण्यात येतात. परंतु मंगळवारच्या आभासी पद्धतीने झालेल्या सिनेट सभेत सदस्यांचा आवाज ‘म्यूट’ करण्यात आला, तर प्रश्न उपस्थित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ‘हॅण्ड रेझ’ पर्यायही वारंवार नाकारण्यात येत होता. त्यामुळे आवाज दाबण्याचा प्रकार कुलगुरूंकडून होत असल्याचा आरोप सिनेट सदस्यांकडून करण्यात आला.

पत्रकारांना प्रवेश नाकारला
मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन सभा घेऊन या सभेपासून पत्रकारांना दूर ठेवल्याची कृती लोकशाहीविरोधी असल्याचा हल्लाबोल बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर यूनियनने (बुक्टू ) केला.

Web Title: Yes Bank Deposit Case Convicted; Sent to ‘that’ officer of the university on compulsory leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.