होय, मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार-खासदार गजानन कीर्तिकर
By मनोहर कुंभेजकर | Published: October 31, 2023 07:21 PM2023-10-31T19:21:01+5:302023-10-31T19:21:07+5:30
2014 पासून आज मितीस त्यांनी सलग दोन वेळा या मतदार संघाचे खासदार म्हणून नेतृत्व केले आहे.
मुंबई- 2024 मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबईलोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची स्पष्टोक्ती शिंदे गटाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी लोकमतला दिली. 2014 पासून आज मितीस त्यांनी सलग दोन वेळा या मतदार संघाचे खासदार म्हणून नेतृत्व केले आहे.
बाळासाहेबांची शिवसेना गटाचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखिल मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांना सांगितले आहे.मी या मतदार संघात सलग दोन वेळा या मतदार संघातून खासदार म्हणून या मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी दि,11 नोव्हेबर रोजी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर मी या मतदार संघाची उभारणी करून अनेक माजी नगरसेवक,आणि पदाधिकाऱ्यांना,शिवसैनिकांना पक्षात सामील करून त्यांची एक मजबूत फळी उभारली आहे असे त्यांनी ठोसपणे सांगितले.
या मतदारसंघात आमच्या पक्षातील इच्छुकाचे नाव न घेता त्याने मतदार संघात जसा काही तो आगामी उमेदवार असल्याची गणपती नवरात्रत्सवात त्याने बॅनरबाजी आणि भेटी गाठी सुरू केल्याची तक्रार आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याचे त्यांनी सांगितले.उद्धव बाळासाहेब गटातून आपले पुत्र व उपनेते अमोल कीर्तिकर यांना याच मतदार संघातून त्यांचा उमेदवारीला हिरवा कंदील दिला आहे असे विचारले असता खासदार कीर्तिकर म्हणाले की, अमोल जरी येथून उमेदवार असला तरी मी येथून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.