गेल्या दोन दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'बारामतीचे चुलते, पुतणे दोघेही चोर आहेत. अशी टीका काल आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार आणि खासदार शरद पवार यांच्यावर केली होती. यावर आज अजित पवार यांनी तो कुणी इतका मोठा नेता नाही त्याला उत्तर द्यावं. त्याचे डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलंय अशा शब्दात अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. यावर गोपीचंद पडळकर यांनीही प्रत्युत्तर देत टीका केली.
जाणुनबुजून कुणी गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर...; अजित पवारांनी थेट खडसावलं
'हो मी उपटसुंभ आहे, पवार कुटुंबाला उपटून टाकणार, असं प्रत्युत्तर गोपीचंद पडळकर यांनी दिले. अजित पवारांना उपटून टाकणार असा टोलाही गोपीचंद पडळकर यांनी लगावला.
विरोधी पक्षनेते अजित पवार काय म्हणाले?
'मी प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधिल नाही. तो कुणी इतका मोठा नेता नाही त्याला उत्तर द्यावं. त्याचे डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलंय अशा शब्दात अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केला. समाजात काही किंमत आहे का? समाजात त्याच्या शब्दाला काही आदर आहे का? हे पाहून माध्यमांनी समोरच्याला प्रश्न विचारले पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.
शरद पवारांनी कृषी क्षेत्रात जे योगदान दिले त्याची नोंद जगाने घेतली. शेततळे, राष्ट्रीय फलोत्पदान योजना, आधुनिक तंत्रज्ञान, शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना दिलेले प्रोत्साहन हे पवारांचे योगदान विसरला का? वेगवेगळ्या भागात कृषी विज्ञान केंद्र उभारली. संशोधनासाठी कोट्यवधीचा निधी दिला. एकदा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करायचा म्हणून पहिल्यांदा ७१ हजार कोटी कर्जमाफी यूपीए सरकारच्या काळात पवारांच्या नेतृत्वात दिली होती. एखादा कुणी बालिश प्रश्न, आरोप करत असेल तर उगीच वेळ वाया घालवू नये अशा शब्दात अजित पवारांनी नाव न घेता गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.