पवारांचा माणूस म्हणूनच ठाकरे सरकार बनवले, संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 07:24 AM2022-04-08T07:24:45+5:302022-04-08T07:26:47+5:30

Sanjay Raut News: होय, मी शरद पवारांचाच माणूस आहे हे काही लपून राहिलेले नाही. पवारांशी जवळीक असल्यानेच महाविकास आघाडी सरकार स्थापन करू शकलो व माझ्या पक्षप्रमुखाला मुख्यमंत्रिपदी बसविले.

Yes I'm Sharad Pawar's Man, So formed the Thackeray government , Sanjay Raut spoke clearly, said ... | पवारांचा माणूस म्हणूनच ठाकरे सरकार बनवले, संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले...  

पवारांचा माणूस म्हणूनच ठाकरे सरकार बनवले, संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले...  

googlenewsNext

मुंबई : होय, मी शरद पवारांचाच माणूस आहे हे काही लपून राहिलेले नाही. पवारांशी जवळीक असल्यानेच महाविकास आघाडी सरकार स्थापन करू शकलो व माझ्या पक्षप्रमुखाला मुख्यमंत्रिपदी बसविले. ठाकरे सरकार स्थापण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडल्यानेच भाजपने माझ्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणा मागे लावल्या आहेत; पण आम्ही कोणाला घाबरत नाही, असे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी भाजपवर हल्लाबोल केला. 
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत दिल्लीहून मुंबईला परतले. तेव्हा शिवसेना कार्यकर्त्यांनी राऊत यांचे विमानतळावर जंगी स्वागत केले. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार सुनील प्रभू, सुनील राऊत उपस्थित होते. शिवसैनिकांचे हे शक्तिप्रदर्शन नाही तर लोकांच्या मनातली चीड आणि संताप असल्याचे राऊत म्हणाले.
 केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप आमच्यावर हल्ले करीत आहे; पण आम्ही लढत राहू. द्वेषाचे व सूडबुद्धीचे राजकारण फार काळ टिकणार नाही. यामुळे भाजप राज्यात २५ वर्षे सत्तेत येणार नाही. तुम्ही तुमची कबर महाराष्ट्रात खोदली आहे, आता ही कबर देशातही खोदली जाईल. यापुढे भाजपची जशी पावले पडतील तशीच पावले आमचीही पडतील, ही तर केवळ सुरुवात आहे, असे राऊत म्हणाले. 
आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी किरीट सोमय्या यांनी पैसा गोळा केला. देशभरातील दानशूर व देशप्रेमींनी सुमारे ५६ ते ५७ कोटी रुपये जमा केले. मात्र, हा पैसा राजभवनात जमा केला नाही. हा पैसा सोमय्या व त्याच्या मुलाने हा काळा पैसा पीएमसी बँकेच्या मदतीने पांढरा केला. सोमय्या हा महाराष्ट्रद्वेष्टा आहे; पण आता तो राष्ट्रद्रोही ठरला आहे, असेही राऊत म्हणाले.

Web Title: Yes I'm Sharad Pawar's Man, So formed the Thackeray government , Sanjay Raut spoke clearly, said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.