होय, जुनीच योजना नव्या नावाने !

By Admin | Published: March 18, 2015 01:26 AM2015-03-18T01:26:20+5:302015-03-18T01:26:20+5:30

जलयुक्त शिवार अभियान ही योजना कार्यान्वित केल्याची कागदपत्रे उपलब्ध असतानाही ग्रामविकास विभागाने मात्र तद्दन खोटा खुलासा पाठवत मुख्यमंत्री कार्यालयाचीदेखील दिशाभूल केली आहे.

Yes, the old scheme is a new name! | होय, जुनीच योजना नव्या नावाने !

होय, जुनीच योजना नव्या नावाने !

googlenewsNext

मुंबई : ‘गाव’ हा शब्द वगळून त्या जागी ‘शिवार’ शब्दाचा वापर करीत भाजपा सरकारने जलयुक्त शिवार अभियान ही योजना कार्यान्वित केल्याची कागदपत्रे उपलब्ध असतानाही ग्रामविकास विभागाने मात्र तद्दन खोटा खुलासा पाठवत मुख्यमंत्री कार्यालयाचीदेखील दिशाभूल केली आहे.
‘गाव’च्या जागी केले ‘शिवार’, शब्दांचा खेळ जुन्या योजनांची केली कॉपी’ असे वृत्त ‘लोकमत’ने १५ मार्चच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने पाठविलेला खुलासाही १७ मार्चच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आला.
जलयुक्त शिवार ही भाजपा सरकारची फ्लॅगशिप योजना असल्याचा दावादेखील त्या खुलाशात करण्यात आला. राज्यपालांच्या भाषणात ही योजना नवीन असल्याचे म्हटले गेले, मात्र ‘जुन्याच बाटलीत नवे ज्युस’ असे या योजनेचे स्वरूप आहे. बातमी देताना कोठेही त्याच्या तपशिलाबद्दल अथवा त्याच्या यशस्वितेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नव्हतेच, फक्त जुनी योजना नव्या नावाने आणली गेली असे म्हटले होते; मात्र फडणवीस सरकारला एवढीही टीका सहन झाली नसेल, अशी प्रतिक्रिया यावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Web Title: Yes, the old scheme is a new name!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.