हो, आत्महत्या केलेल्या डॉ. पायल तडवीचे रॅगिंग झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 06:12 AM2019-05-30T06:12:02+5:302019-05-30T06:12:15+5:30

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर तपास करणाऱ्या अँटी रॅगिंग कमिटीने आपला अहवाल मंगळवारी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सादर केला.

 Yes, suicidal Dr. Payal Tavvi was ragged | हो, आत्महत्या केलेल्या डॉ. पायल तडवीचे रॅगिंग झाले

हो, आत्महत्या केलेल्या डॉ. पायल तडवीचे रॅगिंग झाले

googlenewsNext

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर तपास करणाऱ्या अँटी रॅगिंग कमिटीने आपला अहवाल मंगळवारी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सादर केला. या अहवालात आरोपी डॉक्टरांनी पायलची रॅगिंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, तसेच या आरोपींनी जातीवाचक उल्लेख केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अहवालात नमूद केले आहे.
अँटी रॅगिंग कमिटीमध्ये समाविष्ट असणाºया २१ सदस्यांपैकी १६ सदस्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. यामध्ये रुग्णालयातील डॉक्टर्स, विद्यार्थी प्रतिनिधी आणि काही प्रस्थापित सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. पायलने गेल्या वर्षी मे महिन्यात पदव्युत्तर शिक्षणासाठी नायर रुग्णालयात प्रवेश घेतला. त्यानंतर, वर्षभर या प्रकरणातील तिन्ही संशयित आरोपींनी तिचा छळ केला, तसेच त्यांनी पायलसाठी अर्वाच्य भाषा वापरली, असे चौकशी दरम्यान समोर आले आहे. अद्याप अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे असल्याने, त्यावर कोणत्याही प्रकारचे भाष्य सध्या करता येणार नसल्याची प्रतिक्रिया नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.
दरम्यान, डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही अटक डॉक्टरांना न्यायालयाने ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर मंगळवारी सायंकाळी डॉ. भक्ती मेहरे आणि रात्री डॉ. हेमा आहुजा या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर, बुधवारी डॉ. अंकिता खंडेलवालला अटक करण्यात आली.
>काय म्हणतो अहवाल!
अँटी रॅगिंग कमिटीच्या अहवालानुसार, नायर रुग्णालयांचा रॅगिंग विरोधी विभाग अकार्यान्वित असून, स्त्रीरोगतज्ज्ञ विभागाचे युनिट हेड चिंग लिंग यांच्यावरही या आत्महत्येसाठीचा ठपका ठेवण्यात आला आहे. पायलने रॅगिंग विरोधात तक्रार करूनही त्यांनी त्यावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढविल्याचे ताशेरे अहवालात ओढले आहेत.

Web Title:  Yes, suicidal Dr. Payal Tavvi was ragged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.