मुंबई : आपल्या विविध मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याने गिरणी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची तातडीने अंमलबजावणी झाली नाही तर कामगार आचारसंहिता संपताच कोणत्याही क्षणी परत सरकारविरोधात एल्गार पुकारेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील, असे आवाहन गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
विद्यमान सरकारने एकाही निर्णयाची अंमलबजावणी केलेली नसल्याने आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे, असे गिरणी कामगार नेते प्रवीण घाग यांनी स्पष्ट केले. गिरणी कामगारांची घोर फसवणूक केली जात आहे, असेही घाग यांनी या वेळी स्पष्ट केले. कामगार कोणत्याही क्षणी परत सरकार विरुद्ध एल्गार करतील आणि त्याची पूर्ण जबाबदरी सरकारची राहील, असे आवाहन कृती संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.