Join us  

राजकारणातील 'योगा'चा दिवस, उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शवासनावरून वाकयुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 9:35 AM

Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis: आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या तीन दिवसांनंतर उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस या दोन बड्या नेत्यांमध्ये शवासनावरून शनिवारी वाक्युद्ध रंगले.

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या तीन दिवसांनंतर उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस या दोन बड्या नेत्यांमध्ये शवासनावरून शनिवारी वाक्युद्ध रंगले. 'कुटुंब तुम्हालाही आहे, व्हॉट्सअॅप चॅट बाहेर येत आहेत. त्यावर बोललो तर तुम्हाला केवळ शवासन करावे लागेल, असे ठाकरे यांनी फडणवीसांना सुनावले, तर, 'आम्ही कुणाच्या घरात घुसलोच तर

त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजप परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे ! बघूच आता शवासन कोणाला करावे लागते ते, असा ट्रीटहल्ला फडणवीस यांनी केला.

ठाकरे गटाची शिवाजी नाट्यमंदिर येथे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, मी पाटण्याला गेलो, तर हे कुटुंब वाचवायला गेले म्हणतात. फडणवीसांनी इतक्या खालच्या पातळीवर येऊ नये. कुटुंब त्यांनाही आहे, अनेक व्हॉट्सअॅप चॅट बाहेर येत आहेत. आम्ही बोललो तर त्यांना केवळ शवासन करावे लागेल. सर्व ट्रीटद्वारे उत्तर दिले. ते म्हणाले, शिवसैनिक, महाराष्ट्र माझे कुटुंब आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरे कुणी घेत असेल, तर तुमचे तुम्हाला माहिती आहे. मात्र मी माझे कुटुंब जपणार. ठाकरेंच्या टीकेला अमृत फडणवीस

मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या माणसाला इतकी 'बालबुद्धी' असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करू नका. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुमचे नडे (घसा) केव्हा सैल होतील हे समजणारदेखील नाही, असे

फडणवीस यांनी सुनावले.

यांच्यासंबंधीच्या प्रकरणाची किनार होती.

हिंदुत्व वेशीवरः मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल सत्तेसाठी आधीच हिदुत्व खुंटीला टांगले होते, पाटण्याला जाऊन ते वेशीवर टांगले. तुम्हाला सोडण्याची आमची भूमिका योग्यच होती. केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकाची आघाडी होणार नाही आणि लोकही तिला स्वीकारणार नाहीत. अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.बाळासाहेबांनी ज्या कॉंग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली, त्याच लोकांच्या टोळीत हे सामील झालेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम ३७० रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. ३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करीत आहेत, असे टीकासही शिंदे यांनी सोडले

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसराजकारण