योगदिन उत्साहात, सर्व वयोगटांतील लोकांनी केली प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 05:12 AM2018-06-22T05:12:49+5:302018-06-22T05:12:49+5:30
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने गुरुवारी नेत्यांसह सामान्यांनीही उत्साहात विविध कार्यक्रमांत सहभाग घेत योगांचे प्रात्यक्षिक केले.
मुंबई : आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने गुरुवारी नेत्यांसह सामान्यांनीही उत्साहात विविध कार्यक्रमांत सहभाग घेत योगांचे प्रात्यक्षिक केले. या वेळी, रोजच्या दैनंदिन आयुष्यात योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांपासून अनेक नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, सेलिबे्रटींनीही योगदिनाच्या विविध उपक्रमांत आवर्जून हजेरी लावली. लहानग्यांपासून ते साठीच्या आजी-आजोबांनीही योगाचे प्रात्यक्षिक करून योगदिन साजरा केला. गेट-वे आॅफ इंडिया येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई शहर, तसेच पतंजली योग समिती व मुंबई ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने योगदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, मुंबई येथील भारत स्वाभिमानी असोसिएशन अध्यक्ष सुरेश यादव, पंतजली समितीचे अध्यक्ष पोपटराव कदम, महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा मेधा चिपकर उपस्थित होते. स्वाभिमानी असोसिएशन अध्यक्ष सुरेश यादव यांनी उपस्थितांना योगप्रकारांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
>पोस्टातर्फे सूर्यनमस्कार विशेष कव्हर व पोस्ट कार्डचे अनावरण
मुंबई : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून पोस्ट खात्यातर्फे सूर्यनमस्कार विशेष कव्हरचे अनावरण करण्यात आले. यावेळी योगाचे मानवी जीवनातील महत्त्व या विषयावर कैवल्यधाम योगा इन्स्टिट्यूटच्या शिल्पा घोडे यांनी मार्गदर्शन केले. २१ मे ते २१ जून या कालावधीत पूर्ण महिनाभर पोस्टाच्या कर्मचाऱ्यांसाठी योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कर्मचाºयांना तणावमुक्त वातावरणात काम करता यावे, यासाठी हे शिबिर आयोजित केले होते. योगाला कर्मचाºयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्यात या शिबिराचा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सध्याच्या वेगवान जगात योगा केल्याने काही प्रमाणात ताण तणाव मुक्तजीवन जगणे साध्य होऊ शकते, हा हेतू या शिबीरामागे होता. महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल एच. सी. अग्रवाल, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, योगशिक्षिका शिल्पा घोडे, पोस्टाचे वित्त व्यवस्थापक के. एस. बरियार, पोस्टाचे जनसंपर्क अधिकारी तथा सहायक संचालक संतोष कुलकर्णी याप्रसंगी उपस्थित होते.