Join us

६५ दिव्यांगांनी सादर केली योग प्रात्यक्षिके; अरुण घुले यांना स्नेहज्योत धैर्यशील व्यक्तीमत्व  २०२३ पुरस्कार 

By मनोहर कुंभेजकर | Published: June 22, 2023 3:24 PM

या कार्यक्रमात सुमारे ६५ दिव्यांगांनी प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. 

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त दहिसर येथील स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान संस्थेतर्फे बोरीवली( पूर्व), चोगले नगर,वेल्फेअर सेंटर येथील सभागृहात दिव्यांग बंधू भगिनींसाठी योगा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुमारे ६५ दिव्यांगांनी प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. 

या वर्षी दिव्यांगांसाठी योगाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी व मार्गदर्शनासाठी स्टेट बँक अधिकारी व योग प्रशिक्षक देशराज चौधरी, शीला शाह व नीतल म्हात्रे त्यांनी योगाचे महत्व विशद करुन काही महत्वाची प्रात्यक्षिके सर्वांकडून  करून घेतली. ॐकाराचे महत्व व ते कशाप्रकारे करावे, निदान झोपतांना तरी प्रत्येकाने किमान १५ वेळा ॐ कार म्हणणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

दिव्यांगांना गतवर्षी ऑनलाईन योगा प्रशिक्षण डॉ. मंजुषा शेवाळे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे  आलेले अनुभव काही बंधूभगिनींनी सर्वांसमोर सादर केले. तसेच स्नेहज्योत धैर्यशील व्यक्तीमत्व  २०२३ पुरस्कार दिव्यांग अरुण घुले यांना देण्यात आला.त्यांनी आपल्या मनोगतातून त्यांना आयुष्यातल्या आलेल्या वाईट अनुभवानंतर उभारी देऊन स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान संस्थेच्या सुधा वाघ यांनी पुन्हा उभे केले आणि आज हा सोन्याचा दिवस मला पाहता आला असे गौवोद्गार काढले.

त्यानंतर तेथे संस्थेच्या हितचिंतक गीता परब यांच्या हस्ते  सर्व दिव्यांगांसाठी फोल्डिंग टेबल व सर्वांना  वरदा साळगांवकर व मनाली कदम यांच्या तर्फे अल्पोपहार  देण्यात आला. तर कु. उषा पेटेकर हिला सोनाली जोशी यांच्यातर्फे व्हिलचेअर दिली, तसेच राजेंद्र पाजले यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी शैक्षणिक मदत देण्यात आली. यावेळी दहिसर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापक अर्चना पै याही प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहज्योतचे ट्रस्टी विजय कलमकर यांनी केले.

टॅग्स :योगासने प्रकार व फायदे