Join us  

‘योग शरीर, मन, आत्मा यांना एकत्रित करते’, रेल्वेत योगदिनी प्रबोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 11:38 AM

पश्चिम आणि मध्य रेल्वेवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

मुंबई : पश्चिम आणि मध्य रेल्वेवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम बुधवार पार्क येथील उत्सव हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. 

व्यक्ती आणि सामाजिक कल्याणासाठी योग दुहेरी भूमिका अधोरेखित करते. योगामुळे सामाजिक समरसता वाढवताना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकास होतो. पश्चिम रेल्वेच्या सहाही विभागांमध्ये योग सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यात अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला होता. 

महाव्यवस्थापकांसह वरिष्ठ अधिकारी सहभागी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव, मध्य रेल्वे विभागांचे प्रमुख, मध्य रेल्वे महिला कल्याण संस्थेचे कार्यकारी सदस्य आणि मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी योग सत्रात सहभागी झाले होते. 

तणाव दूर होण्यास मदत-

१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या सभागृहात कार्यक्रम पार पडला. योग शरीर, मन, आत्मा यांना एकत्रित करते. आरोग्य आणि कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टिकोन देते. 

२) ज्यामुळे जीवनात शांतता येते. नियमितपणे योगिक व्यायाम केल्याने तणावाचे व्यवस्थापन, लवचिकता वाढते, शरीर मजबूत होते आणि दीर्घकाळापर्यंत भावनिक स्थिरता, लक्ष केंद्रित आणि सकारात्मकता निर्माण करण्यास मदत होते. 

३) योग हा गुण विकसित करतो आणि जीवनाचा दर्जा उंचावतो, अशी माहिती मध्य रेल्वेकडून उपस्थितांना देण्यात आली.

टॅग्स :मुंबईआंतरराष्ट्रीय योग दिनपश्चिम रेल्वेमध्य रेल्वे