योगी आदित्यनाथ यांची वर्तणूक जनरल डायरसारखी, राष्ट्रवादीची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 02:27 PM2020-02-20T14:27:58+5:302020-02-20T14:34:28+5:30
जनतेला विरोध करण्याचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतरही पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला गेला.
मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांची वर्तणूक जनरल डायरसाखरी असल्याचे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी सोडले आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचा समाचार घेताना नवाब मलिक म्हणाले की, ''मरायला आले असतील तर जिवंत कसे जातील हे योगी आदित्यनाथ यांनी केलेले विधान लोकशाहीमध्ये कोणत्याही प्रकारे खपवून घेतले जाणार नाही. जनतेला विरोध करण्याचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतरही पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला होता. योगी आदित्यनाथ हे जनरल डायरसारखे वागत आहेत, हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही.''
Maharashtra Min Nawab Malik: The way Adityanath ji (UP CM) said 'marne ko ayenge to zinda kaise jayenge', cannot be tolerated in democracy. SC said that people have right to protest,despite that, police fired on protesters. Yogi ji behaving like General Dyer,it can't be tolerated pic.twitter.com/1y1NItNRjy
— ANI (@ANI) February 20, 2020
नागरिकता संशोधन कायद्याच्या (CAA) विरोधात झालेल्या आंदोलनात मृत्यू झालेल्या लोकांविषयी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. जर कोणी मरण्यासाठी येत असेल तर तो जिवंत कसा राहिला, असं योगी म्हणाले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नागरिकता संशोधन कायद्याविरोधात राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन झाले. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. या हिंसक आंदोलनात 22 लोकांचा मृत्यू झाल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले होते. यावर योगींनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले होते. आंदोनात ठार झालेल्यापैकी कोणीही पोलिसांच्या गोळीने मरण पावले नाही. मृत्यू झालेले सर्वजण हिंसा घडविणाऱ्यांच्या गोळीने मृत्यूमुखी पडले आहेत. जर कोणी लोकांना ठार करण्याच्या उद्देशाने रस्त्यावर उतरत असले तर तो मरतो किंवा पोलीस कर्मचारी मरतो, असे योगींनी सांगितले होते.
संबंधित बातम्या
देशाला समाजवादाची नव्हे, रामराज्याची आवश्यकता : योगी आदित्यनाथ
'जर कोणी मरण्यासाठी येत असेल तर...', CAA आंदोलकांच्या मृत्यूवर योगींचे वादग्रस्त वक्तव्य
'... तर मी योगी आदित्यनाथांच्या छाताडावर बसून 32 हाडं मोडली असती'