मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांची वर्तणूक जनरल डायरसाखरी असल्याचे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी सोडले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचा समाचार घेताना नवाब मलिक म्हणाले की, ''मरायला आले असतील तर जिवंत कसे जातील हे योगी आदित्यनाथ यांनी केलेले विधान लोकशाहीमध्ये कोणत्याही प्रकारे खपवून घेतले जाणार नाही. जनतेला विरोध करण्याचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतरही पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला होता. योगी आदित्यनाथ हे जनरल डायरसारखे वागत आहेत, हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही.''
संबंधित बातम्या
देशाला समाजवादाची नव्हे, रामराज्याची आवश्यकता : योगी आदित्यनाथ
'जर कोणी मरण्यासाठी येत असेल तर...', CAA आंदोलकांच्या मृत्यूवर योगींचे वादग्रस्त वक्तव्य
'... तर मी योगी आदित्यनाथांच्या छाताडावर बसून 32 हाडं मोडली असती'