'योहान ब्लेक' असणार टाटा मुंबई मॅरेथॉनचे आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बेसेडर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 06:34 PM2022-12-28T18:34:46+5:302022-12-28T18:36:44+5:30

योहान ब्लेक यांची टाटा मुंबई मॅरेथॉनचे आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. 

Yohan Blake has been selected as the International Event Ambassador for the Tata Mumbai Marathon | 'योहान ब्लेक' असणार टाटा मुंबई मॅरेथॉनचे आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बेसेडर 

'योहान ब्लेक' असणार टाटा मुंबई मॅरेथॉनचे आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बेसेडर 

googlenewsNext

मुंबई: जमैकाचा आंतरराष्ट्रीय विक्रमी धावपटू योहान ब्लेक यांची 15 जानेवारी 2023 रोजी होणार्‍या टाटामुंबई मॅरेथॉनच्या 18व्या आवृत्तीसाठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रेस टुडेने ही घोषणा केली आहे. जगातील एका सर्वोत्तम आणि लोकप्रिय मॅरेथॉनशी जोडला गेल्याचा मनस्वी आनंद झाला, असे  त्याने म्हटले आहे. प्रोकेम इंटरनॅशनल आयोजित जगातील टॉप टेन मॅरेथॉनमध्ये स्थान मिळालेली टाटा मुंबई मॅरेथॉन ही जागतिक ॲथलेटिक्स गोल्ड लेबल रोड  रेस आहे. त्यात 405,000 अमेरिकन डॉलर ईतक्या रकमेचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. कोरोना मारामारीचा  अपवाद वगळता सातत्याने आयोजित करण्यात आलेली ही मॅरेथॉन केवळ मुंबई शहराच्या आत्म्याचेच नव्हे तर प्रोत्साहन आणि अतूट विश्वासाचेही प्रतीक आहे.  

योहान ब्लेक हा जमैकाचा असून जगातील दुसरा सर्वात वेगवान धावपटू आहे. 2012 लंडन ऑलिंपिकमध्ये या स्प्रिंटच्या  बादशहाने 4 बाय 100 मीटर रिले सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी 100 मीटर आणि 200 मीटर धावणे प्रकारात बाजी  मारताना अनोखा विश्वविक्रम नोंदवला. त्याच्या कठोर प्रशिक्षणामुळे माजी महान  धावपटू उसेन बोल्टने त्याला 'द बीस्ट' असे टोपणनाव दिले. त्यानंतर ब्लेकने अनेक दुखापतींवर मात करून २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये ४x१०० मीटर रिलेचे दुसरे सुवर्णपदक आपल्या नावे केले.  

"टाटा मुंबई मॅरेथॉनचा ​​आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बेसेडर म्हणून माझा सहभाग खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी मला आशा आहे. त्याचा एक भाग होण्याचा खूप आनंद आहे. आता मुंबईत कधी येतो, असे झाले आहे, असे ब्लेक म्हणाले. डेईगू येथे  झालेल्या 2011 जागतिक स्पर्धेत चुकीच्या सुरुवातीमुळे बोल्टला अंतिम फेरीसाठी अपात्र ठरवण्यात आल्यानंतर ब्लेक याने. 92 सेकंदात सुवर्णपदक जिंकले. 100 मीटर धावणे प्रकारात विश्वविजेता ठरलेला तो सर्वात सर्वात तरुण धावपटू ठरला.


त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये ब्रुसेल्समध्ये 200 मीटरमध्ये त्याने दुसरे स्थान पटकावले. तरीही त्याने हे  अंतर 19.26 सेकंदात पार केले आणि पुढच्या वर्षी जमैकन ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये त्याने 100 मीटर आणि 200 मीटर या दोन्ही प्रकारांमध्ये बोल्टचा पराभव केला. लंडन ऑलिम्पिकनंतर, ब्लेकने 2012 मध्ये लुसान येथील आयएएएफ स्पर्धेत 100 मीटरमध्ये 9.69 सेकंद धावून या प्रकारात नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यामुळे तो बोल्ट याच्यानंतर इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान धावपटू बनला. 

योहान ब्लेक हा केवळ विश्वविक्रमी ॲथलीट नसून प्रभावशाली आणि परोपकारी आहे. ब्लेकने जमैकामध्ये वंचित मुलांसाठी YB Afraid फाउंडेशनची स्थापना केली. "वंचितांना मदत करणे हा नेहमीच एक अद्भुत अनुभव असतो," असे तो म्हणाला. YBAF वंचित तरुणांच्या शैक्षणिक, सामाजिक, शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करते. या संस्थेच्या माध्यमातून ब्लेक याने 44 तरुण मुलांसाठी एक नवीन अत्याधुनिक निवासस्थान आणि शैक्षणिक आणि क्रीडा केंद्र उघडले आहे, एक कार्यशील आणि प्रमाणित लाकूडकाम प्रशिक्षण केंद्र तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे.  

योहान ब्लेक या जागतिक स्तरावरील एका महान खेळाडूच्या मुंबई मॅरेथॉनवरील नियुक्तीबद्दल प्रोकेम इंटरनॅशनलचे जॉइंट एमडी विवेक सिंग यांनी आनंद व्यक्त केला आहे. तो केवळ एक अप्रतिम ऍथलीट म्हणूनच नव्हे तर वायबी अफ्रेड फाऊंडेशनच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठीही एक मोठी प्रेरणा आहे. योहान ब्लेक, आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बेसेडर म्हणून टाटा मुंबई मॅरेथॉनचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करत आहेत. मुंबईतील उपस्थिती स्पर्धकांना प्रेरित ठेवण्यास आणि स्पर्धेतील अंतर पार करण्यास मदत करेल. त्याला आमच्या कुटुंबात सहभागी करून घेण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत, असे विवेक सिंग म्हणाले.  

खेळामध्ये टाटांचे अमूल्य योगदान 

  • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससह (टीसीएस) जगातील आघाडीच्या आयटी सेवा, सल्लागार आणि व्यवसाय समाधान संस्थांपैकी एक असलेल्या टाटा समूहाच्या 2021-22 मध्ये $128 अब्जच्या (रु. 9.6 ट्रिलियन) एकत्रित कमाईसह जागतिक उपक्रम आहे. मुंबई मॅरेथॉनचे ते टायटल स्पॉन्सर आहेत.  
  • 75 वर्षांहून अधिक काळ खेळ हा टाटा समूहाचा अविभाज्य भाग आहे. टाटाच्या संघटनेने क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, बुद्धिबळ, ऍथलेटिक्स, पर्वतारोहण आणि मोटर रेसिंग यांसारख्या खेळांद्वारे अनेक पुरस्कार विजेते खेळाडू घडवले आहेत. याने उपेक्षित समुदायांच्या विकासातही मदत केली आहे आणि क्रीडा संघ, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच प्रशिक्षण अकादमींना समर्थन दिले आहे. टाटा स्पोर्ट्स क्लबची स्थापना 1937 मध्ये देशभरातील कर्मचारी वर्गामध्ये खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने करण्यात आली.
  • TCS जगभरातील अनेक प्रमुख इव्हेंट प्रायोजित करते, TCS न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉन, TCS ॲमस्टरडॅम मॅरेथॉन, TCS वर्ल्ड 10K आणि TCS लीडिंग लोपेट (जगातील सर्वात मोठी क्रॉस-कंट्री रन). जगभरातील समुदायांमध्ये आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून लंडन, शिकागो, बोस्टन आणि ऑस्ट्रेलिया येथील मॅरेथॉनसाठी हे तंत्रज्ञान भागीदार देखील आहे.

 

Web Title: Yohan Blake has been selected as the International Event Ambassador for the Tata Mumbai Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.