‘कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास तुम्ही जबाबदार’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 10:32 AM2022-04-23T10:32:44+5:302022-04-23T10:35:09+5:30
या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल, तसेच याप्रकरणी दखलपात्र देखील नोंदविण्यात येइल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मुंबई : मुंबई पोलिसांनी शुक्रवारी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल, तसेच याप्रकरणी दखलपात्र देखील नोंदविण्यात येइल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
रवीराणा दाम्पत्याला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४९ अंतर्गत पाठविण्यात आली आहे. परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधितांच्या कृतीने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून ही नोटीस बजावण्यात आली. दरम्यान मातोश्रीसह ‘वर्षा’ बंगला व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्याचीही सुरक्षा पोलिसांनी वाढविली आहे.