‘कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यावरही सरकार टिकवू शकता, मग मराठ्यांना टिकणार आरक्षण देण्यास उशीर का?’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 08:19 PM2023-10-24T20:19:53+5:302023-10-24T20:21:00+5:30
Shiv sena UBT Dasara Melava: आज विजयादशमी दसऱ्यानिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे मुंबईत होत आहेत. यामध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणाचे पडसादही उमटले.
आज विजयादशमी दसऱ्यानिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे मुंबईत होत आहेत. यामध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणाचे पडसादही उमटले. शिवसेनेचे नेते नितीन बानुगडे पाटील यांनी दसरा मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारव घणाघाती टीका केली.
नितीन बानुगडे पाटील शिंदे सरकारवर टीका करताना म्हणाले की, न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यानंतरही तुम्ही सरकार टिकवू शकता. तर मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण देण्यास तुमच्याकडून उशीर का होतोय, असा घणाघाती सवाल नितीन बानुगडे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. सुषमा अंधारे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य म्हटलं जातं. मात्र मला ही तुलना अतिशयोक्ती वाटते. चाणक्य हे माणसं घडवतात. तुम्ही कुणाला घडवलंय, तुम्ही तर माणसं संपवत आहात, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.