तुम्हीच लावा ओल्या कचऱ्याची विल्हेवाट

By admin | Published: March 25, 2016 02:52 AM2016-03-25T02:52:31+5:302016-03-25T02:52:31+5:30

डम्पिंग ग्राउंडवरील आगीच्या घटनांमुळे कचऱ्याचा प्रश्न पेटलेला असताना आता डम्पिंग ग्राउंडवरील भार कमी करण्यासाठी ओल्या कचऱ्याची विल्हेवाट सोसायट्यांच्या आवारातच

You just dispose of the washed waste | तुम्हीच लावा ओल्या कचऱ्याची विल्हेवाट

तुम्हीच लावा ओल्या कचऱ्याची विल्हेवाट

Next

मुंबई : डम्पिंग ग्राउंडवरील आगीच्या घटनांमुळे कचऱ्याचा प्रश्न पेटलेला असताना आता डम्पिंग ग्राउंडवरील भार कमी करण्यासाठी ओल्या कचऱ्याची विल्हेवाट सोसायट्यांच्या आवारातच लावण्याचा प्रकल्प उभा करण्याचे फर्मान मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी सोडले आहे. यासंदर्भातील जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.
मुंबईत दररोज साडेनऊ हजार मेट्रिक टन कचरा तयार होत आहे. मात्र मुलुंड आणि देवनार डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात आला आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य होण्यास पालिकेने ओला व सुका कचरा वर्गीकरण योजना आणली. मात्र निवासी सोसायट्यांकडून अल्प प्रतिसाद आणि अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे हा प्रकल्प अपयशी ठरला.
डम्पिंग ग्राउंडवर दररोज जाणाऱ्या कचऱ्याचा भारच कमी करण्यासाठी ओला कचरा जिथे तयार झाला तिथेच त्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ओला व सुका कचरा वेगळा करण्यात आला तरी, डम्पिंग ग्राउंडवर हा कचरा एकत्रच जातो. त्यामुळे निवासी सोसायट्यांमध्येच ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प हाती घेण्याची सूचना आयुक्त अजय मेहता यांनी केली आहे.

सहायक आयुक्त असतील जबाबदार
निवासी सोसायट्यांमध्ये असे प्रकल्प उभे करण्याची जबाबदारी त्या वॉर्डातील सहायक आयुक्तांवर असणार आहे. त्यानुसार संबंधित सोसायट्यांमध्ये बैठका घेऊन रहिवाशांना प्रकल्पाचे महत्त्व पटवून देणे, त्यासाठी राजी करणे ही जबाबदारी सहायक आयुक्तांची असणार आहे. हा प्रकल्प अंमलात आणण्यासाठी कृती आराखडा तयार होणार आहे.

Web Title: You just dispose of the washed waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.