तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं तरी कसं?; कचरावेचक महिलांवर उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 02:28 AM2020-07-20T02:28:27+5:302020-07-20T06:10:40+5:30

घराबाहेर पडायचे असले तरी सॅनिटायझर आणि मास्क आवश्यक आहे. पण ते घेण्यासाठी पैसे नाहीत.

You tell me, how do we live ?; Time of starvation on waste pickers | तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं तरी कसं?; कचरावेचक महिलांवर उपासमारीची वेळ

तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं तरी कसं?; कचरावेचक महिलांवर उपासमारीची वेळ

Next

मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंद्यांचे नुकसान झाले. कोरोनामुळे कचरावेचक महिलांना घराबाहेर पडता येत नाही आणि जर कचरा मिळाला तर विकत घेणारी दुकाने बंद आहेत. लॉकडाऊनमध्ये कचरावेचक महिलांचा रोजगार बुडाला असून या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.

संगीता शिंगारे यांनी सांगितले की, शिवाजीनगर परिसरात कचरा वेचते. जवळच गाडी असते, त्या गाडीवर आम्ही कचरा विकतो. लॉकडाऊनमुळे खूप हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आयुष्यात कधी अशी वेळ आली नव्हती. सरकार, प्रशासनाने कोणतीही मदत केली नाही. स्त्रीमुक्ती संघटनेने मदतीचा हात दिला. शेजारी आणि नातेवाइकांनी मदत केली. त्यावरच आमचे घर चालते. जगणे मुश्कील झाले आहे. आता कचरा मिळत नाही. मिळाला तरी कचरा विकण्यासाठी दुकाने उघडे नाहीत. त्यामुळे जगणे मुश्कील झाले आहे. मदतीवर अवलंबून आहे, कोणी काही दिले तर त्यावरच घर चालते.

घराबाहेर पडायचे असले तरी सॅनिटायझर आणि मास्क आवश्यक आहे. पण ते घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे साबणाने हात धुतो आणि साडीचा पदर मास्क म्हणून वापरतो, असे एका महिलेने सांगितले.कचरावेचक महिलांची स्थिती भयंकर आहे. कोरोनामुळे महिलांना घराबाहेर पडता येत नाही. तसेच लोक आता कचऱ्याचे विलगीकरणही करत नाहीत. वाटेल तसा कचरा टाकतात. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. तसेच कचºयाचे प्रमाणही कमी झाले आहे.

मॉल्स आणि हॉटेल, जिथे कचरा निर्माण होतो ते सर्व बंद आहे. तसेच कचरा मिळाला तरी विकत घेणारे दुकानदार दुकाने बंद करून गेले आहेत. यामुळे कचरा विकण्याचीही सोय नाही. परिणामी कचरावेचकांची उपासमार होत आहे. - ज्योती म्हापसेकर, संस्थापक सदस्य, स्त्रीमुक्ती संघटना तीस वर्षांपासून कचरावेचकाचे काम करते.

दिवसाला ५०० ते ६०० रुपये मिळायचे, पण लॉकडाऊनमध्ये घरीच आहोत. कोणतेही काम करत नाही. पैसे नाहीत तर कर्ज काढून आणि इतरांच्या मदतीवर घर चालवत आहोत. लोकप्रतिनिधींनी कोणतीही मदत केली नाही, पण आता तरी त्यांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा. लॉकडाऊनमुळे तीन-चार महिन्यांपासून कचरावेचकाचे काम बंद आहे.
- सखुबाई गाडेकर, कचरावेचक

Web Title: You tell me, how do we live ?; Time of starvation on waste pickers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.